राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशातील आझमगडच्या सीमेवर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राऊत हे आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाल्यानंतर बांसाच्या दौऱ्यावर होते. डॉ. राऊत यांनी स्वत: ट्विट करत ही महिती दिली आहे.
नितीन राऊत हे आझमगड सीमेवर आल्यानंतर प्रथम पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. मात्र, आपल्याला बांसा येथे जायचे आहे, असे राऊत यांनी पोलिसांना सांगितले आपण बांसा येते जाऊ शकणार नाही कारण तेथे आता कोणालाही जाण्याची परवानगी नसल्याचे पोलिसांनी डॉ. राऊत यांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जवळच्या गेस्ट हाऊसवर चलण्याची विनंती डॉ. राऊत यांना केली. मात्र आम्ही गेस्ट हाऊस येथे जाऊन का करणार, आम्हाला आमचे लोक ज्या ठिकाणी थांबलेत निदान तिथे तरी जाऊ द्यावे, अशी विनती राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना केली.
बसगाव जिल्हा आज़मगढ़ उत्तरप्रदेश में मेरे भाई दलित प्रधान सत्यमेव दस्ते की हत्या हुई। पीड़ित परिवार को मिलने से मुझे रोका जा रहा है। pic.twitter.com/SOTzgv4Z24
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) August 20, 2020