मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना गो’ अशी घोषणा दिली होती आता तेच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. मंगळवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आठवले यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. कफ आणि अंगदुखीच्या तक्रारीनंतर आठवले यांची सोमवारी कोरोना टेस्ट झाली होती.
रामदास आठवले यांनी लवकर बरे व्हावे यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना खास आठवले स्टाईलनेच शुभेच्छा दिल्या आहेत. रामदास आठवले यांच्या कविता राजकीय वर्तुळात खूप प्रसिद्ध आहेत तशाच अंदाजात गृहमंत्र्यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.त्याबाबतचे एक ट्विट देशमुख यांनी केले आहे.
कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा,
ग्रासले त्याच कविमित्र रामदासा
धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका,
कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का
रामदास आठवले जी लवकर बरे व्हा …
अभिनेत्री पायल घोषला त्यांच्या पार्टीत प्रवेश देण्यासाठी सोमवारी आठवलेंनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी तोंडावरचा मास्क खाली केला होता. त्यामुळेच त्यांना कोरोना झाल्याची शक्यता असल्याची चर्चा होत आहे. याबाबतचा एक फोटो देखील व्हयरल झाला होता.
दरम्यान, देशात कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असताना रामदास आठवले यांनी एप्रिल महिन्यात ‘गो कोरोना गो’चा नारा दिला होता. त्यांचा हा नारा कोरोना काळादरम्यान खूप व्हायरल झाला होता.
तसेच महाराष्ट्रात राजकारणातील अनेकांना कोरोनाने विळखा घातला आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांच्यावर ब्रीज कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली ते आयसोलेशनमध्ये आहेत.
'कोरोना-गो'चा घेतला ज्याने वसा,
ग्रासले त्याच कविमित्र रामदासा ll
धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका,
कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का ll@RamdasAthawale लवकर बरे व्हा. 🌹— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 28, 2020
Read Also
कलर्स वाल्यांना पण माहिती आहे खरं सरकार कुठे आहे ! मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांना कलर्सकडून आलेल्या पत्रामध्ये फरक https://t.co/F5KkDAiFC7#Rajthackarey #CMThackarey #Shivsena #MNS #Ameyakhopakar @RajThackeray @OfficeofUT @MNSAmeyaKhopkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 29, 2020