मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना, 30 मार्च रोजी प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्या पोटाच स्कॅनिंग करण्यात आलं. त्यात त्यांच्या पित्ताशयात खडे असल्याचं आढळलं आणि त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला गेला. त्यानुसार त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच त्यांच्यावर अजून एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं.
या पार्श्वभूमीवर आज पवार यांना परत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे व त्यांच्या पित्ताशयावर होणारी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून, त्यांची तब्येत स्थिर असल्याचीही बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत सांगितली आहे.
दरम्यान, आधीच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी पवारांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. तरीही या काळात पवार, राज्यातल्या घडामोडींवरून चाललेल्या राजकारणात सक्रिय भूमिका आणि निर्णय घेत होते. त्यानंतर १५ दिवसांनी आज त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
30 मार्च रोजी, त्यांच्या पित्ताशयामध्ये अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला होता. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली होती. यानंतर 3 एप्रिल रोजी शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार असल्याची माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली होती.
मात्र गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले, तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले होते.तसेच, या दुसऱ्या शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या यकृतावरील ताण कमी होणार आहे. त्याचसोबत त्यांना थोडी काविळ देखील झाली होती, ती देखील कमी होण्यास मदत होईल, असं देखील मायदेव यांनी सांगितलं होतं.
Update
A successful Laparoscopy surgery was conducted today on our party President Sharad Pawar Saheb's Gall Bladder by Dr. Balsara.
He is in stable health and is recuperating in his room at the Breach Candy Hospital, Mumbai— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 12, 2021