IMPIMP
Sunetra Pawar, or Parth Pawar, or someone else from the Ajit Pawar group in the Rajya Sabha Sunetra Pawar, or Parth Pawar, or someone else from the Ajit Pawar group in the Rajya Sabha

अजित पवार गटाकडून राज्यसभेवर सुनेत्राताई पवार, की पार्थ पवार, की तिसरा कोणीतरी?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने चार उमेदवार उभे केले होते. मात्र अजित पवार गटाचा फक्त रायगड लोकसभा मतदारसंघातील सुनील तटकरे विजय झालेत. यातच बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी दीड लाखांपेक्षा पेक्षा अधिक मताधिक्क्याने पराभव केला. त्यानंतर आता अजित पवार गटात राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या राज्यसभेवर आता सुनेत्रा पवार, की पार्थ पवार की तिसरा कोणीतरी ? अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

हेही वाचा…“उद्या मी आयोध्येला गेलो तर रामाचा सन्मान ठेवीन, परंतु मोदींनी…”,शरद पवारांनी मोदींना पुन्हा डिवचलं 

यातच मुंबईत अजित पवार गटाची महत्वाची बैठक पार पडली. यात प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त कार्यकाळासाठी पार्थ पवारांचं नाव राष्ट्रवादीच्या वतीनं देण्यात आल्याची सुत्रांनी माहिती दिलीय. मुंबईत होत असलेल्या या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार हजर होते. यामध्ये हा निर्णय झाल्याची माहिती समोर आलीय.

हेही वाचा..“हा भटकता आत्मा तुम्हाला आता सोडणार नाही”, शरद पवारांनी मोदींना पुन्हा डिवचलं 

दुसरीकडे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री करा, असा ठराव पुण्यात अजित पवार गटाकडून मांडण्यात आला. या मागणीचा ठरावही कार्यकारिणीने एकमताने मंजूर करून घेतला आहे. परंतु पुणे राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष दिपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यातही या मागणीवरून मतभिन्नता आहे.

दरम्यान,  नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भुजबळांच्या नावाची चर्चा होती. मात्र ती जागा महायुतीत शिंदे गटाला गेल्याने भुजबळ काहीसे नाराज झाल्याचे दिसून आले. यातच राज्यसभेबाबत अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचं नाव देखील समोर आलं आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…मंचरमध्ये महाविकास आघाडीत मोठा राडा, कोल्हेंनी निकमांचा ‘भावी आमदार’ उल्लेख केला अन्… 

हेही वाचा…भाजप विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार ? अजित पवार अन् शिंदेंचं काय होणार ? 

हेही वाचा..“जीवंत असेपर्यंत शरद पवारांसोबत राहणार”, बीडच्या बजरंग सोनवणेंनी मिटकरींना दिलं प्रत्युत्तर

हेही वाचा..मुरलीधर मोहोळांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार 

हेही वाचा..विधानसभेत महायुतीसमोर धोक्याची घंटा..! अन्यथा, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार ?