IMPIMP
Sunil Tatkare shouting on ncp leader in mumbai Sunil Tatkare shouting on ncp leader in mumbai

“धनंजय मुंडे, आता सुट्टी नाही हं..! सर्दी, पडसं झालं असं आम्ही ऐकणार नाय”, तटकरेंनी चांगलंच सुनावलं

पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा २५ वा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पदार्पण सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या सुचना दिल्या. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह हसन मुश्रीफ यांना देखील तटकरे यांनी धमकीवजा काही सूचना दिल्या. त्याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा..Ground Report : पिंपरी-चिंचवडच्या ‘एकनाथ’चा मुंबईतील ‘मातोश्री’वर दबदबा ! दिग्गज नेते ‘मशाल’हातात घेण्याच्या तयारीत 

2019 पासून अजितदादांनी फक्त मंत्रालयात काम केलं आहे. काही लोकं मंत्रालयात देखील कुणी आलं नाही. पक्षाच्या वतीने तुम्हाला आम्ही कार्यक्रमच देऊ. परंतु अधिवेशनाच्या आधी आणि त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रभर आपल्याला फिरायचं आहे. गरज पडली तर प्रत्येक मतदारसंघात दोन वेळा तरी तुम्हाला यावं लागेल. असं देखील सुनील तटकरे यांनी अजित पवारांना सांगितलं आहे.

हेही वाचा…“शिवसेनेच्या बाबतीत भाजपने केंद्रात दुजाभाव केला,” श्रीरंग बारणेंकडून खदखद व्यक्त 

१९९९ ला राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटल्यानंतर ज्या पद्धतीने छगन भुजबळांनी प्रचार केला होता. त्यावेळेसारखा छगन भुजबळांनी देखील २०२४ च्या विधानसभेत प्रचार करायला पाहिजे. दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ तुम्ही देखील तितकाच प्रचार करायला हवा. अन् हल्लाबोल करायला धनंजय मुंडे हे विदर्भापासून ते संपुर्ण जिल्ह्यात सक्रीय राहायला पाहिजे. विदर्भापासून ते सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही हल्लाबोल केला. धनंजय तुम्हाला देखील मी सांगतो की आता सुट्टी नाही. सर्दी झाली, पडसं झालं आम्ही ऐकणार नाही. नाही नाही म्हणजे नाही. तुम्ही काम करा. तुमचं मंत्रीपद तसचं राहिलं. असं म्हणत हसन मुश्रीफ तुम्ही फक्त कोल्हापुरचे नेते नसून संपुर्ण महाराष्ट्राचे नेते आहात. तुम्ही देखील संपुर्ण महाराष्ट्रात फिरायला हवे. असेही ते म्हणाले.

आमदारांनी देखील आपापल्या मतदारसंघाची काळजी घ्यायला हवी. कारण तुम्ही देखील त्या त्या मतदारसंघात पॉवरफुल आहेत. अजितदादांच्या विचाराचे लोक तयार झाले पाहिजेत. ज्यावेळी ऑक्टोंबरमध्ये विधानसभेचा निकाल लागेल. त्यावेळी चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादीचे आमदार दिसायला पाहिजेत.  महायुतीमध्ये समन्वय ठेवायला हवे. यामध्ये कोणताही संभ्रम व्हायला नको. असेही ते म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा…“राज्यात शिंदे-ठाकरे विधानसभेला पुन्हा एकत्र येणार” ? शिंदेंच्या नेत्यांनी दिला मोठा दुजोरा 

हेही वाचा..शिंदे गटानंतर आता अजित पवार गटातही मंत्रीपदावरून खदखद, आण्णा बनसोडे थेट स्पष्टच बोलले 

हेही वाचा..“ताई, आपली मळमळ, आम्ही समजू शकतो”, मुरलीधर मोहोळांकडून सुप्रिया सुळेंना जशास तसं उत्तर 

हेही वाचा..“सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय राज्यमंत्री करा”, अजित पवार गटाचा ठराव मंजूर 

हेही वाचा…“आता कशी वाजवली घंटी”? ‘ते’ विधान शिंदेंना भोवलं..! कोल्हापुरात कॉंग्रेसने शिंदेंना डिवचलं