रायगड : सत्तेच्या खेळामध्ये ज्यांनी रायगडची संस्कृती माती मोल केली अशा रायगड जिल्ह्यातील तटकरे नावाच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करताना भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
एखाद्या घटनेचं राजकीय स्वार्थासाठी भांडवल करुन घेणे ही सुनिल तटकरेंची वृत्ती आहे. त्यांनी गेली 20 ते 25 वर्षात विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचं काम केलं. त्यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल,” असं मत दरेकर यांनी व्यक्त केलं. ते पेणमध्ये भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल केल्याच्याविरोधातील निषेध मोर्चात बोलत होते.
📍पेण | रायगडच्या पालकमंत्री आणि स्थानिक खासदारांनी केलेल्या सत्तेच्या गैरवापराच्या निषेधार्थ आयोजित 'निषेध मोर्चा'!
सत्तेच्या खेळामध्ये ज्यांनी रायगडची संस्कृती माती मोल केली अशा रायगड जिल्ह्यातील तटकरे नावाच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध! @SunilTatkare pic.twitter.com/tmcvHUdJwl
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) October 29, 2020
तटकरेंशी राजकीय मैत्री करणारे इतर पक्षांचेही अस्तित्व संपविण्याचे काम ते करीत आहेत. शिवसेनेचे जिल्ह्यात 3 आमदार आहेत. तरी सुद्धा पालकमंत्री पद राष्ट्रवादीला गेले आहे. शिवसेनेच्या आमदारांनीही शासकीय कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून तक्रार दिली आहे. ही शिवेसेनेसाठी शोकांतिका आहे. तटकरे भाजपला 1 नंबर राजकीय क्षत्रू मानतात. आगामी काळात आम्ही पण तटकरेंना जशास तसे उत्तर देऊ,” असा इशारा दरेकर यांनी दिला.
Read Also ;
अखेर मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे, सुप्रीम कोर्टाने विनोद पाटलांचा अर्ज स्वीकारला https://t.co/bWkA0wqz1H #vinodpatil @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @NCPspeaks @INCMaharashtra @vinayakmete @AshokChavanINC @mieknathshinde
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 29, 2020