नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, कामकाजाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला सवाल विचारला. सुप्रिया सुळेंनी लोकसभेतील आजच्या कामकाजाबाबतचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून याबाबतची माहिती दिली
काय म्हणाल्या सुळे नेमकं यावेळी
लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेरोजगारी आणि कोरोनाचा विषय सभागृहात मांडला. कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला.यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु असं होताना दिसत नाही, अशी टीका सुळे यांनी केली.
लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेरोजगारी आणि कोरोनाचा विषय सभागृहात मांडला.कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला.यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे.परंतु असं होताना दिसत नाही. pic.twitter.com/MmwNSYUm1N
— Supriya Sule (@supriya_sule) September 14, 2020
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, कोरोनामुळे सध्या सभागृहांचे कामकाज रोज चारच तास चालणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपचारांसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हेही गेले असल्याने दोन्ही नेते काही दिवस लोकसभेत नसतील. त्यामुळे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली आहे.