खासदार सुप्रिया सुळे या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच ऍक्टिव्ह असतात.कोणत्याही प्रश्नाबाबत सुळे या त्या – त्या अधिकाऱ्याला किंवा मंत्र्यांना थेट ट्विट करत असतात. आता देखील त्यांनी पुणे सातारा महामार्गाबाबत केंद्रीय परिवह मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत एक ट्विट केले आहे.
काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे नेमकं आपल्या ट्विटमध्ये
खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत केंद्रीय परिवहन व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घालावे अशी मागणी व्टिटरच्या माध्यमातून केली आहे. त्यांनी याबाबतचे ट्विट करताना म्हटले की, पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्तीबाबत आम्ही सातत्याने एनएचआयकडे पाठपुरावा केला आहे.मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले आहे. आता मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर महामार्गावर खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे याकडे केंद्रीय परिवहन व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Despite Regular follow up with @NHAI_Official about the Repair Works of Pune – Satara Highway nothing has been done. With Potholes on along with Monsoon travelling on this road has become extremely difficult
Requesting Hon.@nitin_gadkari Ji to kindly look into matter@OfficeOfNG— Supriya Sule (@supriya_sule) August 6, 2020
पावसाळ्यापूर्वी पुणे सातारा महामार्गाची देखभाल दुरूस्तीची कामे झालेली नाहीत. त्यामुळे आता मान्सूनचा पाऊस सुरू झाला आणि महामार्गावर खड्डे ही अवतरू लागले आहेत. पुणे-सातारा महामार्गाच्या निकृष्ट कामांबाबत अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे व सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी आंदोलने केली होती.अद्यापपर्यंत एनएचआयने या कामांकडे दूर्लक्ष केले असल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी स्वतः याबाबत ट्विट केल्याचे दिसून येते.