पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात होत असलेल्या मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्पात आला आहे. यातच आज पुण्यात महायुती तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र अवकाळी पावसाने सगळ्याच राजकीय नेत्यांची दैना उडवली आहे. यातच वडगावशेरी येथे शरद पवार यांची शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी सभा होणार होती. मात्र सभेत्या ठिकाणी पाणी साचल्याने शरद पवारांची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“मोदी शहांकडून महाराष्ट्राला तोडण्याचा, लुटण्याचा प्रयत्न”
तर पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे यांची पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेवर अवकाळी पावसाचं सावट दिसू लागलं आहे. गेल्या एक तासापासून पुण्यात जोरदार पाऊस सूरू आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी सर्व प्रचाराचं साहित्य देखील भिजून गेलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा होणार की नाही ? यावर अद्याप तरी प्रश्न चिन्ह आहे.
हेही वाचा..“त्यांनी फक्त वार्डाच्या निवडणुका लढल्यात अन्..,”बारणेंचं संजोग वाघेरेंना प्रत्युत्तर
दुसरीकडे शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भरपावसात रोड शो सुरू आहे. याठिकाणी अजित पवार यांची सभा देखील होणार आहे. तर जालण्यात उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“वेळ पडल्यास अभिनयातून ब्रेक घेणार,” त्यामुळेच कोल्हेंनी केलं असं विधान
हेही वाचा…“महात्मा बसवेश्वर यांनी पेरलेल्या लोकशाहीच्या बीजाचा आता झालाय वटवृक्ष”, श्रीरंग बारणे
हेही वाचा…“अजित पवारांचा शिलेदार शरद पवारांच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय”,? एकच चर्चा
हेही वाचा…मोहोळ की धंगेकर, पुणेकरांच्या मनात नेमकं काय ?
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडकरांनी बारणेंसाठी कंबर कसली, भाजप दीड लाखाहून अधिक मताधिक्क देणार