मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने एम्सच्या डॉक्टरांची समिती स्थापन केली होती. या समितीने मुंबईतील कूपर हॉस्पिटलने दिलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट तपासला. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी सोमवारी अंतिम अहवाल सीबीआयला सादर केला. त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. सुशांतचा खून झाल्याचं यातून निष्पन्न होत नसल्याचं एम्सच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी ‘एम्स’नं दिलेल्या अहवालानंतर काँग्रेसनं भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. ‘भारतीय जनता पक्षाचं तोंड काळं होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे,’ अशी बोचरी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
‘एम्सच्या अहवालामुळं भाजपचं तोंड पुरतं काळं झालं आहे. भाजपच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तेश्वर पांडे यांना उगाच स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली नाही,’ असा टोला सचिन सावंत यांनी हाणला आहे. ‘मुंबई पोलिसांना ज्या वाईट पद्धतीनं बदनाम करण्यात आलं, महाराष्ट्राचा अपमान केला गेला. ते पाहता महाराष्ट्राची जनता भाजपला माफ करणार नाही. सुशांतच्या मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप भाजपला महागात पडेल,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.
अब एम्स का रिपोर्ट आने के बाद #भाजपा का मूंह पुरी तरह से काला हो चुका है। भाजपा का षड्यंत्र बेनकाब हो गया है। गुप्तेश्वर पांडे को VRS ऐसेही नहीं मिली।
मुंबई पुलिस को जिस घिनौने तरीके से बदनाम किया गया, महाराष्ट्र का अपमान किया गया, भाजपा को महाराष्ट्र की जनता मांफ नहीं करेगी। https://t.co/ujhM67Nj6v— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 29, 2020