कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात कोरोना योद्धा सर्वात पुढे राहून काम करत आहे. यातच घरपोच ऑनलाईन फुडची डिलिव्हरी करणारे डिलिव्हरी बॉय देखील पुढे आहेत. कोरोनाच्या संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घरपोच जेवण पोहचवण्याचे काम हे डिलिव्हरी बॉय करत आहेत.
Thank you so much Shashikant Vairal from Swiggy for delivering food during the pandemic and rains. @swiggy_in pic.twitter.com/vVGMMJOT3T
— Supriya Sule (@supriya_sule) August 20, 2020
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील घरी जेवणाची ऑर्डर केली होती. एका स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने सुप्रिया सुळेंची घरी ऑर्डर पोहचवली. यावेळी त्यांनी आपुलकीने या तरुणाची चौकशी केली.
महामारी आणि भरपावसात डिलिव्हरी करायला आलेल्या शशिकांत या तरुणाचे सुप्रिया सुळेंनी आभार मानले. यावेळी त्यांनी या तरुणाची आपुलकीने चौकशी करत कुटुंब त्याच्या कॉलेजविषयी देखील माहिती विचारत त्याच्या कामाचे कौतुक केले.