IMPIMP
Take power from the hands of Mr. Modi. Sharad Pawar's strong criticism of Modi Take power from the hands of Mr. Modi. Sharad Pawar's strong criticism of Modi

“मोदी साहेबांच्या हातातून सत्ता काढून घ्या”, शरद पवारांची मोदींवर जोरदार टिका

मुंबई :  आजच्या निवडणुकीत आपल्याकडून एखादी चुक झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला व आपल्या पुढच्या पिढ्यांना द्यावी लागेल. पुढची पिढी प्रगतीच्या रस्त्यावर जायची असेल तर आज आपण दिलेली भाजप तडीपारची घोषणा कृतीत आणली पाहिजे. मोदी साहेबांच्या हातातून सत्ता काढून घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणारा प्रत्येक घटक सामुहिक शक्ती बनून एक नवा इतिहास हा निर्माण केला पाहिजे. असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यासाठी प्रचार  सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा…अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली ? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

आजचे प्रधानमंत्री इंग्रजांनी जी भूमिका घेतली, हुकूमशाहीच्या रस्त्याची त्याचा स्वीकार करून त्यांनी पाऊल टाकण्याला सुरुवात केली आहे. म्हणून हे संकट साधन संकट नाही, तुमच्या लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर हे संकट आहे. या संकटातून जर आपल्याला वाचायचं असेल, तर सामूहिक शक्ती एकत्रित केली पाहिजे, आणि आज जो या ठिकाणी उमेदवार उभा केला आहे, संजय दिना पाटील त्यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचे काम हे तुम्हा आम्हा सर्वांना करायचे आहे. ही निवडणूक साधी सोपी नाही. असेही आवाहन शरद पवारांनी मतदारांना केलं.

मोदी सत्ता कशासाठी चालवतात? तर मूठभर लोकांच्या हिताची जपणूक करणं हे सूत्र प्रधानमंत्र्यांनी या देशामध्ये घेतलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण केला. हे राज्य पहिल्यांदा गुजरात आणि महाराष्ट्र असं एक राज्य होतं. मराठी लोकांनी संघर्ष केला आणि हे राज्य स्वतंत्र राज्य झालं. गुजरातची आणि महाराष्ट्राची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं. म्हणून १९६० साली १ मे ला ज्यावेळी महाराष्ट्र झाला, त्यावेळची महाराष्ट्राची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये फरक आहे. असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा..“नवमतदारांचं मत आम्हालाच,’ गुलाबराव पाटलांनी जळगावात ठोकला मोठा दावा 

तर आता सध्या महाराष्टाचं चित्र बदलतंय, ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्यासाठी अधिक कारखानदारी कशी होईल? इथली शेती संपन्न कशी होईल? अधिक हातांना काम कसं मिळेल? याकडे त्यांचं लक्ष नाही. त्याऐवजी सबंध राज्यामध्ये उभे राहिलेले कारखाने गुजरातमध्ये कसे जातील? याची काळजी ते घेतायत. गुजरातमध्ये गेला तर माझी तक्रार नाही पण त्यांनी स्वतःचे कारखाने उभे करावेत. महाराष्ट्रात उभे राहिलेले कारखाने इथून हलवायचे, इथल्या हातांना काम जे होतं ते काम घालवायचं आणि ते कारखाने दुसऱ्या राज्यांमध्ये द्यायचे, ही महाराष्ट्रावर अन्याय करणारी गोष्ट आहे. ही गोष्ट मोदींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये चाललेली आहे, त्याचा दुष्परिणाम हा महाराष्ट्रावर झाल्याशिवाय राहणार नाही. अशा इशाराही शरद पवारांनी दिलाय.

READ ALSO :

हेही वाचा…शुभेच्छा देण्याची लयच घाई..! निकालाच्या आधीच लागले ‘भावी खासदार’ म्हणून बॅनर्स 

हेही वाचा…अखेर प्रफुल्ल पटेल विरोधकांसमोर झुकले, मोदींना जिरेटोप घालणं पटेलांच्या आलं अंगलट

हेही वाचा…मोदींच्या सभेसाठी शरद पवारांचं नाव झाकलं, शरद पवार गटाने मोदींना डिवचलं 

हेही वाचा…“शिंदे, अन् अजितदादांनी कांद्याची माळ घालून मोदींचे स्वागत करावे” 

हेही वाचा…अजित पवार, शिंदे गटाला किती जागा मिळणार ? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट आकडाच सांगितला