पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची महाआघाडीतील जागा वाटपाचा पेच सुटला आहे. राष्ट्रीय जनता दल 144 आण काँग्रेस 870 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर डाव्या आघाडीच्या वाटेला 29 जागा आल्या आहेत. याशिवाय महाआघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांची निवड केली आहे. आरजेडी, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (माले), सीपीएम आणि व्हीआयपी महाआघाडीतील पक्ष आहेत
बिहार विधानसभा चुनाव में सीपीएम-4, सीपीआई-6, सीपीआई (माले)- 19 , कांग्रेस-70 और RJD-144 सीटों पर चुनाव लड़ेगी : महागठबंधन में सीटों के बंटवारे पर तेजस्वी यादव, RJD #BiharElections pic.twitter.com/LeLhoLGXE7
— ANI_HindiNews (@AHindinews) October 3, 2020
आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले की, ‘जर बिहारची जनता त्यांना संधी देईल तर ते त्यांच्या मान-सन्मानाची रक्षा करतील. आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो. माझा डीएनए देखील शुद्ध आहे.’
2015 च्या विधानसभा निवडणुकीत राजद आणि जेडीयू एकत्र होते. मात्र नंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजदची साथ सोडत भाजपसोबत यूती केली होती. त्या निवडणुकीत राजद-101, जेडीयू – 101 व काँग्रेसने 41 जागांवर निवडणूक लढली होती.
दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल.