सांगली : राज्यातील कोरोना व्हायरस महामारीचे संकट कायम आहे. राज्य सरकार टप्याटप्याने एक एक गोष्ट सुरू करत आहेत. मात्र सरकारने अद्याप मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मंदिरे खुली करण्याची सातत्याने मागणी ठाकरे सरकारकडे केली जात आहे. यातच आता मंदिरे लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी सांगलीत काँग्रेसच्या वतीने काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीते बाळासाहेब थोरात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी मंदिरे सुरू करण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. नियमावली तयार होताच धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली.
थोरात म्हणाले की, मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे नियोजन करून निर्णय घेणे आवश्यक आहे. लवकरच याबातची घोषणा होईल.