IMPIMP
anil parab with uddhav thackeray anil parab with uddhav thackeray

ठाकरे गटाचा उमेदवार विजयाच्या उंबारठ्यावर, अनिल परबांचा विजय निश्चित

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जून रोजी मतदान पार पडलं. यानंतर या निवडणुकाचा निकाल आज सोमवारी जाहीर होत आहे. यातच मुंबई पदवीधरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा…“राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं..” नव्या फौजदारी कायद्यावरून शरद पवारांचा टोला 

मुंबई पदवीधरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होती. आताच हाती आलेल्या निकालामध्ये ठाकरे गटाचे अनिल परब हे आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजपचे किरण शेलार पिछाडीवर गेले आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर ६१ मतांनी आघाडीवर आहेत. तर चार पैकी दोन फेऱ्यांमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब हे जाहीर मतांचा कोटा गाठण्याच्या दिशेने आहेत. यासाठी ५ हजार ८०० मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे.

हेही वाचा..पेपरफुटीप्रकरणी कायदा होणार का ? रोहित पवारांचा सवाल, फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

अनिल परब विजयाच्या दिशेने जात असल्याने कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. मतदारांनी भाजपला नाकारून अनिल परब यांना निवडून दिले. यात आनंद असल्याचे वरूण सरदेसाई यांनी सांगितले.

दरम्यान,  दुसऱ्या बाजूला कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि कॉंग्रेसच्या रमेश किर यांच्यात चुरशीची लढत आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज. मो. अभ्यंकर हे निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचा फैसला लवकरच समोर येणार असल्याने उत्सुकता कायम आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“गुजरातमध्ये आम्ही तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही”, थेट संसदेत राहुल गांधींनी मोदींना दिलं 

हेही वाचा..पंकजा मुंडेंचं भाजपकडून अखेर झालं राजकीय पुनर्वसन, विधान परिषदेवर मिळाली संधी 

हेही वाचा…“विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर..! ‘या’ पाच जणांना मिळाली भाजपकडून संधी 

हेही वाचा..“आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये”, वादग्रस्त विधान केल्यानंतर भीडेंवर शब्दाचा भडीमार 

हेही वाचा…शिंदे गटात नगरमध्ये मोठी खांदेपालट, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं 

Leave a Reply