IMPIMP
Thackeray group's position is that no one should be deprived of their plate while giving reservation Thackeray group's position is that no one should be deprived of their plate while giving reservation

“आरक्षण देतांना कोणाच्या ताटातलं काढून देऊ नये, ही ठाकरे गटाची भूमिका”

मुंबई : राज्यात मराठा आरक्षण विरूद्ध ओबीसी आरक्षण असा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून उपोषण करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री गावात उपोषण सुरू केलं आहे. त्यामुळे राज्य सरकार दोन्ही बाजूंनी पुर्णत: फसलं आहे. याच पार्श्वभूमीवर काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी विविध गोष्टींवर चर्चा करण्यात आली. यातच आता कोणाच्या ताटातलं काढून देऊ नये अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे.

हेही वाचा..राष्ट्रवादीत नाराज असलेल्या भुजबळांचे शिवसेनेतील दार बंद करा, बैठकीत झाला मोठा निर्णय 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत मोठं भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात आरक्षणावरून संघर्ष सुरूच आहे. लक्ष्मण हाके असोत किंवा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे, मनोज जरांगे दोघेही म्हणतात. आमचा सरकारवर विश्वास नाही. मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांविरूद्ध उभे आहेत, ते राज्याच्या आणि शांततेच्या दृष्टीने योग्य नाही. कोणाच्या ताटातलं काढून देऊ नये ही ठाकरे गटाची भूमिका आहे.

हेही वाचा..खडसेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, भाजपमध्ये खडसेंना मोठी जबाबदारी ? 

यातच काल झालेल्या बैठकीत ओबीसी समाजाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या निर्णय घेतानाच, मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मान्य करता येणार नाही. अशी  भूमिका एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारने मांडली. तसेच यावेळी कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत तसेच सगेसोयरेंची अंमलबजावणी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तर आज राज्य सरकारमधील काही मंत्री उपोषण कर्त्यांचं उपोषण सोडविण्यासाठी आंदोलनस्थळी जाणार आहेत.

दरम्यान, अटल सेतूवरील रस्त्यावर पडलेल्या भेगांसंदर्भात देखील संजय राऊतांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. अटल सेतू हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्याला अटलजींचं नाव दिलं असलं तरी त्याची पायाभरणी ही कॉंग्रेस राजवटीत सुरू झाली. त्या प्रकल्पाला अशाप्रकारे तडे जावेत हे योग्य नाही, काय प्रकरण आहे ? ते पहावं लागेल. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य यायला पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी केलीय.

READ ALSO :

हेही वाचा..दोन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले ? उपोषणकर्त्यांना आज मंत्री भेटणार 

हेही वाचा..खेडमधून अतुल देशमुखांची उमेदवारी निश्चित; ‘मविआ’च्या मुंगसे, काळे यांचा पत्ता कट!

हेही वाचा..“मी ९ मंत्री पाडणार, १३ तारखेला सांगतो,” मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा 

हेही वाचा…अटल सेतूवर पडल्या लांबच लांब भेगा, नाना पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश 

हेही वाचा..“भाजपच्या सर्व्हेमुळे आमचा खेळ झाला”, महायुतीतील बड्या नेत्याचा आरोप, महायुतीत राजकीय युद्ध 

Leave a Reply