IMPIMP
That' Pune opened the door of the Lok Sabha for you. The post of a special friend for the Mohols That' Pune opened the door of the Lok Sabha for you. The post of a special friend for the Mohols

“‘त्या’ पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली”, मोहोळांसाठी खास मित्राची पोस्ट

मुंबई : काल नरेंद्र मोदी यांनी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल ७२ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी गोपनियतेची शपथ दिली. यातच पहिल्यांदाच खासदार झालेल्या पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांनी देखील काल राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून आता पुण्यात मोठा जल्लोष व्यक्त केला जात आहे. यातच मुरलीधर मोहोळ यांचे मित्र आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी मोहोळांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा…“मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही”, दिल्लीत मोठी खलबतं 

मोहोळांसाठी प्रवीण तरडे यांनी लिहिलेली पोस्ट जशीच्या तशी..

मित्रा ,

आज शब्दं अपुरे पडतील पण लेखन थांबायचं नाही .. कित्येकजण योगायोगानं राजकारणात येतात. पण तू काहीतरी ठरवून यामध्ये आलास.. राजकारणात येवून लोक समाजकारण लोणच्या सारखं वापरतात पण तु ते ताट भरून घेतलंस , पोटभरून रिचवलंस.. कदाचित म्हणुनच कोरोनाच्या महामारीत तु पुण्याला वाचवलंस . तुझ्या त्या पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली अन् पुणेकरांनी पण त्याची सव्याज परतफेड केली.. तुला लाखोच्या मताधिक्यानं दिल्ली दाखवली.. दिल्लीनं तर दिलादारपणाचा कळस गाठला आणि थेट मंत्रीपदाची माळ तुझ्या गळ्यात घातली.. पण मित्रा एवढं सगळं होउनही असं वाटतय ही तर फक्तं सुरवात आहे अजुनही “ परम वैभवम नेतुमेतत स्वराष्ट्रम “ या दैवी संदेशा पासून आपण थोडं दूरच आहोत.. येत्या पंचवीस वर्षात जितकं जमेल तितकं या दैवी संदेशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू .. पुण्येश्वराची पुण्याई तुझ्या पाठीशी आहेच बाकी मुळशीची शान , पुण्याचा अभिमान , भारत देशाचा स्वाभिमान ठरो.. तुझं खुप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा.

हेही वाचा…“शरद पवारांना मी सोडायला नव्हतं पाहिजे होतं”, कुणी केली खंत व्यक्त 

दरम्यान,  २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यावर विशेष लक्ष राहिले आहेत. केंद्रात सत्ता स्थापनेनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली होती. त्यात पुणे देशात दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर या योजनेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुण्यातूनच करण्यात आली.

READ ALSO :

हेही वाचा…राज्यात आघाडीचंं वारं वाहू लागलं..! एकनाथ शिंदे अन् अजित पवार गटातील ४० आमदारांची लवकरच घरवापरी

हेही वाचा…राज्यातील ‘या’ सहा खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान 

हेही वाचा…“आम्ही देखील त्यांच्या शब्दावर राहू, थोडा धीर ठेवू”, कॅबिनेट मंत्री न मिळाल्यानंतर पटेलांचं विधान 

हेही वाचा…Chandrakant Patil Video | वृक्ष लागवडीत चंद्रकांत दादांनी रचला नवा इतिहास, यंदा एकच लक्ष्य, लावू ६५ हजार वृक्ष 

हेही वाचा..“एक सामान्य कार्यकर्ता ते थेट कॅबिनेट मंत्रीपद”, कसा आहे मोहोळांचा राजकीय प्रवास ?