IMPIMP
That statement shocked Shinde Congress defeated Shinde in Kolhapur That statement shocked Shinde Congress defeated Shinde in Kolhapur

“आता कशी वाजवली घंटी”? ‘ते’ विधान शिंदेंना भोवलं..! कोल्हापुरात कॉंग्रेसने शिंदेंना डिवचलं

कोल्हापुर : लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापुर मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंतशाहू महाराज यांनी दीड लाखावर मताधिक्याने भाजपच्या विद्यमान खासदारांवर विजय मिळवला. मात्र या निवडणुकीत पडद्यामागून कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महत्वाची भूमिका निभावली. यात शाहू महाराजांनी कोल्हापुरात विजय मिळवल्यानंतर शहरात ठिकठिकाणी आता मोठे बॅनर लागले असून त्यावरून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

हेही वाचा…राज्यात आघाडीचंं वारं वाहू लागलं..! एकनाथ शिंदे अन् अजित पवार गटातील ४० आमदारांची लवकरच घरवापरी

कोल्हापुराची निवडणुक महायुतीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. विद्यमान खासदार संजय मंडलीक यांच्या प्रचारासाठी स्वत: एकनाथ शिंदे कोल्ह्यापुरात दोन ते तीन दिवस तळ ठोकून होते. त्यानंतर अखेरच्या दिवशी बंटीची आता घंटी वाजवायची आहे. असा उल्लेख केला होता. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून शाहू महाराजांचा विजय मिळवण्याचा शिंदेंना बॅनरवरून डिवचण्यात आले आहे. यामध्ये आता कशी वाजवली घंटी असा उल्लेख करण्यात आलाय.

हेही वाचा…राज्यातील ‘या’ सहा खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान 

दरम्यान, निकालाच्या दिवशी तीन वाजण्याच्या सुमारास सोळाव्या फेरीचे आकडे समोर यायला सुरूवात झाले होते. त्यावेळी शाहू महाराजांना ४०८१० तर मंडलिक यांना ३८७४९ इतके मते मिळाली होती. शाहू महाराजांनी ९७२६१ मतांची आघाडी घेतली होती. तर पुढच्या फेरीत त्यांनी मताधिक्यात लाखाचा आखडा ओलांडला होता.

READ ALSO :

हेही वाचा..Ground Report : पिंपरी-चिंचवडच्या ‘एकनाथ’चा मुंबईतील ‘मातोश्री’वर दबदबा ! दिग्गज नेते ‘मशाल’हातात घेण्याच्या तयारीत 

हेही वाचा…“शिवसेनेच्या बाबतीत भाजपने केंद्रात दुजाभाव केला,” श्रीरंग बारणेंकडून खदखद व्यक्त 

हेही वाचा..विनोद तावडेंवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा ? विनोद तावडेंचं दिल्लीत वाढलं वजन 

हेही वाचा..मोठी बातमी…! “पंतप्रधान पदाचा कारभार स्विकारल्यानंतर मोदींचा पहिलाच शेतकऱ्यांसाठी निर्णय” 

हेही वाचा…“‘त्या’ पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली”, मोहोळांसाठी खास मित्राची पोस्ट