IMPIMP
That threat in us, nut can't do this job Ajit Pawar's fox gang That threat in us, nut can't do this job Ajit Pawar's fox gang

“ती धमक आमच्यात, नट हे काम करू शकत नाही”, अजित पवारांचा कोल्हेंना टोला

चाकण :  शिरूर मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे, त्यासाठी पंतप्रधान मोदींसोबत पुण्यातील समेत चर्चा झाली आहे. पुण्यापासून सासवड, आंबेगाव बुद्रुक, चाकण, देहूरोड, वाघोली आणि उरुळी कांचनपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचा निधी द्यायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेतच, पण केंद्राचा निधी आणण्यासाठी मोदींची मदत लागणार आहे, त्यासाठी मोदींच्या विचाराचा खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव यांना आपल्याला लोकसभेत पाठवायचे आहे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची सांगता प्रचार सभा शनिवारी  चाकण येथे पार पडली, त्यावेळी अजित पवार बोलत होते.

हेही वाचा…“मोदींनी पवारांना ऑफर नाही तर सल्ला दिला, ” देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार 

अजित पवार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मदत केली नसती तर पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करता आली असती का? असा सवाल करून डॉ. कोल्हे यांच्या महामार्गाच्या बाह्यवळण कामाच्या बढ़ायांवर वार केले. बिबट्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी जुत्रर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांसाठी विशेष बाब महणून दिवसा थ्री फेज लाइट देण्यासाठी निर्णय केला जाईल असे सांगून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जायची गरज पडली तरी चालेल पण हा प्रश्न धसास लावणार असे पवार यांनी सांगितले. तसेच खेड, पुरंदर परिसरात विमानतळ करायचे झाल्यास ती धमक फक्त आमच्यात आहे. नट हे काम करू शकत नाही. ते फक्त डायलॉग मारण्याचे काम करू शकतात असा टोला पवार यांनी कोल्हे यांना लगावला.

हेही वाचा…मोदींनी ठाकरेंना ऑफर दिलीय, तुम्ही ठाकरेंना सोबत घेणार का ? एकनाथ शिंदे म्हणाले…, 

दरम्यान,  २०१९ साली आपण डॉ. अमोल कोल्हे यांना तिकीट देऊन चूक केली असल्याचे सांगितले. माझ्या चुकीची भरपाई यावेळी करायची असून शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

पावसातही सभा गाजवली

चाकण येथे सुरू असलेल्या सभेदरम्यानच पाऊस आला, त्यामुळे सभा रद होईल अशी शंका निर्माण झाली. पावसामुळे मतदार आजूबाजूच्या शेडमध्ये निवान्याला गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रवीण दरेकर उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, रुपाली चाकणकर, आमदार दिलीप मोहिते पाटील, प्रदीप गारटकर, शरद बुडे पाटील महायुतीचे पदाधिकारी भर पावसात व्यासपीठावर बसून राहिले. तर  अजित पवार यांनी आपण शेतकऱ्याची औलाद असल्यामुळे आपल्याला पाऊस हवाच आहे. पाऊस आल्यानंतरच आपली पेरणी होती. त्यामुळे पावसात सभा घेण्यासारखा दुसरा आनंद नाही, अशी भावना व्यक्त केली. तसेच भर पावसातब मार्गदर्शन करीत विकासाचे मुद्दे मांडले.

READ ALSO :

हेही वाचा…राज ठाकरेंचा फतव्यानंतर पुण्यात “आमचं ठरलंय”चा ट्रेंड! मोहोळांच्या पथ्यावर पडणार 

हेही वाचा…“तुमची स्वप्न पुर्ण करण्याकरता घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आढळरावांना विजयी करा”, नितीन गडकरी 

हेही वाचा…“गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी पुण्याचं चित्र बदललं”, पुण्यात मोहोळांसाठी फडणवीसांची सांगता सभा 

हेही वाचा…“त्यावेळी घरदार अन् राजकारण सोडून कुठेतरी गेलो असतो”, मोहोळांनी सांगितली जूनी आठवण 

हेही वाचा..“आढळराव पाटलांना विजयाचा चौकार मारण्याची संधी द्या”, शेवटच्या क्षणी अजितदादांचं मतदारांना आवाहन