राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या आजी शारदाबाई पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाचा एक जुना ठेवा, ट्वीटरवर शेअर केला असून अत्यंत भावूक असा संदेश लिहिला आहे.
शरद पवार यांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. त्यावेळी आपलं वय तेव्हा सहा वर्षांचे होते, असंही त्यांनी या ट्वीटमध्ये सांगितलं आहे.
‘माझी आजी शारदाबाई पवार आम्हा सर्वांना सोडून गेली त्याला आज 45 वर्षे झाली. मला ती आजही आठवते, मी सहा तर अभिजीत 4 वर्षांचे असताना विजू अक्का आम्हा दोघांना तिच्या भेटीसाठी घेऊन गेल्या होत्या. ज्यावेळी त्यांची भेट झाली होती, तेव्हा आम्हाला पाहून तिच्या चेहऱ्यावर खुललेलं हसू आजही आठवतं. ती आमची शेवटची भेट’ अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली.
माझी आजी शारदाबाई पवार आम्हा सर्वांना सोडून गेली त्याला आज ४५ वर्षे झाली.मला ती आजही आठवते,मी सहा तर अभिजीत ४ वर्षांचे असताना विजूअक्का आम्हा दोघांना तिच्या भेटीसाठी घेऊन गेल्या होत्या.आम्हाला पाहून तिच्या चेहऱ्यावर खुललेलं हसू आजही आठवतं. ती आमची शेवटची भेट! pic.twitter.com/rR2VW9AloX
— Supriya Sule (@supriya_sule) August 12, 2020