IMPIMP
The Chief Minister has given a big promise that if you get 75 to 80 percent polling in Maval, you will be given the post of minister The Chief Minister has given a big promise that if you get 75 to 80 percent polling in Maval, you will be given the post of minister

“मावळात ७५ ते ८० टक्के मतदान झाल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ”, मुख्यमंत्र्यांनी दिलं मोठं आश्वासन

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचार विविध मुद्यांमुळे चर्चेत आला. या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. तर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार रॅली घेतली. या प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. यावेळी शेवटच्या क्षणी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना एक इशारा दिला.

हेही वाचा..“ती धमक आमच्यात, नट हे काम करू शकत नाही”, अजित पवारांचा कोल्हेंना टोला 

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे विजयाची हॅट्रिक नक्की करतील. बारणे यांना मोठा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळते. अबकी पार आप्पा तिसरी बार खासदार अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी दिली. तर मावळात ७५ ते ८० टक्के मतदान झाल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ असे यावेळी शिंदेंनी जाहिर केलं आहे.

हेही वाचा…राज ठाकरेंचा फतव्यानंतर पुण्यात “आमचं ठरलंय”चा ट्रेंड! मोहोळांच्या पथ्यावर पडणार 

महाराष्ट्रात तिन्ही टप्प्यामध्ये महायुती सर्वात पुढे असून ४५ पार जागांवर जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर महिलांनी १३ तारखेला मतदानामध्ये सहभागी व्हावं, त्याचबरोबर कुटंबातील व्यक्तींना मतदानासाठी पाठवावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आणि विधानसभेत महिलांना आरक्षण दिलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये संसदेत आणि विधानसभेत महिला दिसतील असेही शिंदे म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा..“माझा राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त शरद पवारांकडे”, नाथाभाऊ का चिडले ? 

हेही वाचा..“तुला पाडीन, तुला पाडीन करतायेत, मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही ?”आव्हाडांचा अजित पवारांना सवाल 

हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांनी ठोकलं शतक, राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकमेव नेते 

हेही वाचा..“निवडणूक लढविण्यासाठी मोदींनी गाई कापणाऱ्या कंपन्यांकडून साडेपाच हजार कोटी घेतले” 

हेही वाचा…“प्रचाराच्या तोफा थंडावल्या, अंतिम टप्प्यात महायुतीची मुसंडी”