IMPIMP
The chief minister's cattle have green fodder, while in Marathwada there is no dry fodder for the cattle The chief minister's cattle have green fodder, while in Marathwada there is no dry fodder for the cattle

“मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवागार चारा, तर मराठवाड्यात गुरांना कोरडा चारही नाही”

छत्रपती संभाजी नगर : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात एव्हाना संपूर्ण महाराष्ट्रात भीषण पाण्याची टंचाई जाणू लागली आहे. याचा फटका माणसांना बसतोय परंतु त्याच बरोबर मुक्या जनावरांना देखील उष्णतेच्या झळा आता बसू लागल्या आहेत. यातच छत्रपती संभाजी नगर येथे एका गो शाळेमध्ये जनावरांना चारा विकत घेण्यासाठी नलावडे कुटुंबियांनी आपलं सोनं गहाण ठेवल्याची माहिती समोर येत आहे.  त्यावरून मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवा चारा आणि दुसरीकडे मराठवाड्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या गुरांना कोरडा चारही मिळत नसल्याची टीका राज्याची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

हेही वाचा…कॉंग्रेसचे संदीप गुळवे ठाकरे गटात, नाशकातील विधान परिषद निवडणुकीचं चित्र बदलणार 

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावात त्यांच्या गुरांना हिरवा चारा देताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर येथील पारूंडी गावातील पारसनाथ गो शाळेतल्या जनावरांसाठी नलावडे कुटुंबियांनी सोनं गहान ठेवण्याचं दिसत आहे. यावरून वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा…०४ जूननंतर अजितदादा गटात बंड, सुनील तटकरे आमदारांना घेऊन डायरेक्ट भाजपमध्ये जाणार ? 

महाराष्ट्रातील ही दोन चित्र मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवागार चारा आणि दुसरीकडे मराठवाड्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या गुरांना कोरडा चाराही मिळत नाहीये.. गुरांचा चारा आणि पाण्याची सोय करण्यासाठी शेतकरी कुटुंबांना घरातील स्त्रीचे सोने गहाण ठेवून पैश्याची जुळवाजुळव करण्याची वेळ आली आहे आणि महायुती सरकार मात्र अजूनही ढिम्मच! आचारसंहितेचे कारण दाखवून सत्ताधारी स्वतःच्या बेजबाबदार कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे हे महाराष्ट्र बघत आहे! अशी टिका विजय वडेट्टीवार यांनी केलीय.

READ ALSO :

हेही वाचा…जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार, अर्धा शरद पवार गट रिकामा होणार ? 

हेही वाचा…“RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसलं”, रोहित पवारांचा गंभीर आरोप 

हेही वाचा…जुनपासून सुरू होणार पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं, मोठं कारण आलं समोर 

हेही वाचा…“रक्ताचा नमुना घेण्यासाठी ६ तास, नंतर पिझ्झा खाऊ घातला, अमितेश कुमार यांची बदली करा” 

हेही वाचा..“तुम्ही नेमकं देसाई आहात की कसाई”? रवींद्र धंगेकरांचा शंभुराजेंना सवाल