IMPIMP
shankar jagtap vs ashwini jagtap shankar jagtap vs ashwini jagtap

अश्विनी जगताप अन् शंकर जगताप यांच्यातला संघर्ष वाढला, भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पिंपरी चिंचवड : आगामी काही महिन्यात विधानसभेचा हंगाम सुरू होणार आहे. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असाच सामना होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. अशातच चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे दिसत आहे. याठिकाणी विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी निवडणुक लढवण्याची पुन्हा इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचेच शहाराध्यक्ष आणि अश्विनी जगताप यांचे सख्ये दीर शंकर जगताप यांनी देखील दंड थोपाटले आहेत. त्यामुळे सध्या उमेदवारीवरून घरातच मोठा संघर्ष उभा राहिला आहे.

हेही वाचा…शिंदे गटात नगरमध्ये मोठी खांदेपालट, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं 

माजी नगरसेवकर शत्रृघ्न काटे यांनी १० वी आणि १२ वी मधील गुणवतं विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी शंकरशेट वगळून खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह मंचावर आमदार अश्विनी जगताप, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, राजेंद्र जगताप, मोरेश्वर शेडगे असे सर्व ताकदीचे इच्छूक नेते आले होते. ग.दि. मा. नाट्यगृहात भाऊसाहेब भोईर यांनी आयोजित केलेल्या समारंभातही जगताप सोडून सर्व ताकदीचे इच्छूक एकाच व्यासपीठावर आल्याने शंकरशेठ अक्षर : एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले. अशा सर्व घटनांवरून अश्विनी जगताप आणि शंकरशेठ यांच्यात संघर्ष असल्याचं दिसून आलं.

हेही वाचा…“राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं..” नव्या फौजदारी कायद्यावरून शरद पवारांचा टोला 

याचवेळी शंकरशेठला उमेदवारी दिलीच तर आम्ही रिंगणात उथरणार. असा इशारा माजी नगरसेवकर राजेंद्र जगताप यांनी दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला एकवेळ पुन्हा आमदार अश्विनी जगताप यांना संधी दिली तरी चालेल मात्र, शंकरशेठ नकोत असे उघडपणे बोलणाऱ्यांचा आवाज मोठा आहे. हा संघर्ष टिपेला पोहचला असून त्यात आमदारताईंची सरशी होणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“मैं समुंदर हूॅं लौटकर वापस जरूर आऊंगा”, माजी आमदार विलास लांडेंचं अखेर ठरलं ?

हेही वाचा..साहेब..! तुमचा शब्द खरा ठरवला.. विजयी किशोर दराडेंनी मुख्यमंत्र्यांना केला फोन

हेही वाचा…विधान परिषदेसाठी शिंदे गटाकडून दोन माजी खासदारांना संधी, तर ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी

हेही वाचा…सभागृहात अंबादास दानवेंचा तोल सुटला, विधान परिषदेच्या सभागृहात मोठा गोंधळ 

हेही वाचा..“आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये”, वादग्रस्त विधान केल्यानंतर भीडेंवर शब्दाचा भडीमार 

Leave a Reply