सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत सध्या राजकीय पक्षांचा प्रचारामध्ये चांगलाच जोर धरू लागलाय यातच सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. महायुतीकडून राम सातपुते तर महाविकास आघाडी कडून प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र या दोघांमध्ये सरळ लढत होत असताना वंचित कडून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल गायकवाड यांनी वंचित कडून माघार घेतल्याने या ठिकाणी मोठ्या घडामोडी घडल्या. मात्र त्यातच आता राहुल गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला जोरदार झटका दिलाय.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात सरळ लढत होत आहे. यातच वंचित कडून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आले होते. मात्र राहुल गायकवाड यांनी निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सोलापुरात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात सरळ लढत निश्चित झाली. यातच आज राहुल गांधी यांनी सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्यासाठी सभा घेतली या सभेत राहुल गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
राहुल गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत प्रणिती शिंदे यांची ताकद वाढवली आहे. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास एक लाख 75 हजार वंचितच्या तिकिटावर ती मतं घेतली होती. त्यामुळेच या ठिकाणी सुशील कुमार शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. यातच आता राहुल गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित बदलली जाणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.