IMPIMP
The fight between Ajit Pawar and Yugendra Pawar in the Legislative Assembly is inevitable The fight between Ajit Pawar and Yugendra Pawar in the Legislative Assembly is inevitable

विधानसभेत अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत अटळ, युगेंद्र पवारांकडून तयारी सुरू

पुणे : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीत देखील पवार विरूद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण युगेंद्र पवार यांच्याकडून विधानसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे. लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आठवड्यातील दर मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात राहणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा राजकीय सामना होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…मोठी बातमी…”लोकसभा निवडणुकीनंतर आघाडीतील मोठा लोंढा महायुतीत दाखल होणार” 

राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर याठिकाणी प्रथमच पवार विरूद्ध पवार अशी लोकसभेची लढत झाली. यातच आता शरद पवार गटात असलेले युगेंद्र पवार आठवड्यातील दर मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. यावेळी लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मंगळवारी उपस्थित राहणार असल्याचे युगेंद्र पवारांनी सांगितलं आहे.

हेही वाचा..“२०१९ला कोणतीही लाट नव्हती, अचानक पुलवामा हल्ला झाला अन्…”, शरद पवार गटाचं मोठं गौप्यस्फोट 

दरम्यान, पक्षात फुट  पडल्यानंतर पवार संपुर्ण पवार कुटुंबिय शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले. यातच सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी संपुर्ण पवार कुटुबिंय रस्त्यावर उतरले. यामध्ये युगेंद्र पवार यांचा तर याप्रचाराच्या दरम्यान सक्रीय सहभाग राहिलेला आहे. याच वेळी युगेंद्र पवारांनी राजकारणात एंट्री केल्याचीही माहिती आहे. त्यातच आता पुन्हा विधानसभेत पवार विरूद्ध पवार असा सामना रंगणार का ? याकडे सर्वाचंच लक्ष लागून राहिलं आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“धुळ्यात सुभाष भामरेंचा विजयरथ कॉंग्रेस रोखणार” ? राजकीय गणितं बदलली 

हेही वाचा…“मोदींनी गाईवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोलावं,” उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर तिखट प्रहार 

हेही वाचा..“अखंडपणाने विरोधकांना शिवीगाळ देणारे मोदी हे..,”शरद पवारांची मोदींवर जहरी टिका 

हेही वाचा..ठाकरेंनी मनसेचे सहा नगरसेवक फोडले, आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर म्हणाले… 

हेही वाचा..दिंडोरीत भारती पवारांना कांदा रडवणार, भुजबळांनी थेट मोदींना पत्र धाडलं