IMPIMP
yogi yogi

‘जिच्यावर अंत्यसंस्कार झाले ती आमची मुलगी नाही’, पीडित कुटुंबीयांचा प्रशासनावर गंभीर आरोप

हाथरस : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पुन्हा निघाले हाथरस पिडीत कुटुंबाच्या भेटीला पुन्हा निघाले आहेत. दिल्लीतून ते आपल्या राज्यसभा आणि लोकसभेतील सर्व खासदारांना घेऊन हाथरसला निघाले आहेत. आता त्यांना योगी सरकार पिडीत कुटुंबाला भेटू देणार कि नाही हे बघन महत्वाच आहे. पण आता सर्वात महत्वाची बातमी येत आहे कि हाथरस पिडित कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधींसह ५ जणांना भेटण्याची परवानगी योगी सरकारकडून देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातल्या हाथरस अत्याचार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणावरून पोलिसांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल देशभर प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सर्व गावाची पोलिसांनी नाकेबंदी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी अखेर माध्यमांना गावात जाण्याची परवानगी देण्यात आली. पोलिसांनी ज्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हतीच असा दावा पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकरणात राज्य सरकारने SIT चं गठण केलं असून ते तपास करत आहेत. मात्र या किंवा CBI चौकशीवर आमचा विश्वास नाही असंही कुटुंबीयांनी म्हटलं आहे. या प्रकरणात पोलिसांवरही कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पीडितेच्या कुटुंबाने हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेतले.

हाथरसमध्ये १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचे देशभरात संतप्त पडसाद उमटले. विरोधकांनी योगी सरकारला घेरलं, तर आंदोलन करत लोक घटनेबद्दल आपला संताप व्यक्त करत आहे. घटनेवरून तीव्र पडसाद उमटत असतानाच योगी सरकारनं हाथरस प्रकरणात मोठी कारवाई करत या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबन केलं आहे.

योगी सरकारनं निलंबनाची कारवाई केल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना सवाल केला आहे. “योगी आदित्यनाथजी काही जणांना निलंबित करून काय होणार आहे? हाथरस पीडिता व तिच्या कुटुंबीयांना जो भयंकर त्रास देण्यात आला, तो कुणाच्या आदेशावर देण्यात आला? हाथरसचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे फोन रेकॉर्डस सार्वजनिक करण्यात यावेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नये, देश पाहतोय, योगी आदित्यनाथजी राजीनामा द्या,” अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.

 

Read Also :