IMPIMP
Chandrashekhar bawankule Chandrashekhar bawankule

विधान परिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांची यादी व्हायरल, बावनकुळेंनी केला मोठा खुलासा

मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या संभाव्य १० उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या यादीत कोणीतरी खोडसळपणा केला असून केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड विधानपरिषदेसाठी चांगले उमेदवार देईल. असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. परंतु आता त्या दहा जणांच्या यादीत नेमकं कुणाचं नाव आहे. अन् भाजप कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा…“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका 

विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी भाजपच्या दहा जणांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवी नाईक यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र ही यादी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावली आहे.

हेही वाचा…“जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने”, महायुतीच्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसची जबरी टिका

यासंदर्भात बावनकुळे म्हणाले की, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत २० हून अधिक नावांवरती चर्चा झाली आहे. कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. ते पत्र नाहीच. ते एक पान आहे. कुणीतरी त्यावर ठप्पा माराला असून त्याला काही अर्थ नाही. त्यात कुठलाही प्रोटोकॉल नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड विधान परिषदेसाठी चांगले उमेदवार देईल. महाराष्ट्रच्या विकासाकरीता चांगली नावे महाराष्ट्र विधान परिषदेत दिसतील. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. निवडणुकीसाठी काही लोकं अंदाज बांधतात. त्यातून याद्या तयार होता. असा टोलाही त्यांनी लगावला.

READ ALSO :

हेही वाचा..”मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार”, वडेट्टीवारांनी उघडकीस आणला परत एक घोटाळा

हेही वाचा..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घडवणार तीर्थदर्शन, शिंदेंकडून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची’ घोषणा 

हेही वाचा..महाविकास आघाडीचा नवरदेव कोण ? कॉंग्रेस मात्र वऱ्हाडीच्या भूमिकेत, भाजपने डिवचलं 

हेही वाचा…कोल्हापुरात अजित पवार गटाला खिंडार, बडा नेता शरद पवार गटात होणार दाखल 

हेही वाचा..“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका

Leave a Reply