IMPIMP
The politics of betrayal and violence, the percentage of voting in the state The politics of betrayal and violence, the percentage of voting in the state

विश्वासघात अन् फोडाफोडीचं राजकारण, राज्यात मतदानाची टक्केवारी घरसली, कोणाला बसणार फटका ?

मुंबई : मागील काही वर्षात झालेल्या पक्ष फुटीमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरूवातीला शिवसेना अन् त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडली. अनेक नेत्यांनी पक्ष प्रवेश केला. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे घटलेल्या मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडणार त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा…“आम्ही महायुतीतले घटकपक्ष नाही, विधान परिषदनिवडणुक लढणार “, मनसेने महायुतीला दिला कडक इशारा

राज्यात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा संबंध राज्यात घसरलेल्या मतदानाच्या टक्केवाशी काही संबंध आहे का ? असा सवाल निर्माण होत आहे. राज्यातील सर्व ४८ मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीचा विश्लेषण केले असता ज्या मतदारसंघात फुटलेल्या पक्षांनी निवडणुक लढविली. त्याठिकाणी प्रामुख्याने मतदानाची टक्केवारी घसरल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा…गोलमाल है भाईस सब गोलमाल है..! भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळेच पुणे अपघात प्रकरणातील SIT च्या अध्यक्षा 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीत ४८ पैकी १५ मतदारसंघात निवडणुक लढवली. त्यापैकी आठ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरल्याचं दिसून येत आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकूण पाच लोकसभा मतदारसंघात निवडणुक लढवली होती. त्यात चार मतदारसंघात मतदानाची आकडेवारी कमी झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 20 मतदारसंघात निवडणूक लढवली होती.  त्यापैकी दहा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 11 मतदारसंघात निवडणूक लढवली होती. त्यापैकी चार मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे.  भाजपने 28 जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी 19 मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढली. तर नऊ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी काहीशी कमी झाली आहे. काँग्रेसला 17 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली, त्यापैकी दहा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढली. फक्त सात मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी झाली.

READ ALSO :

हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवारांच्या संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू 

हेही वाचा..पोर्श कार अपघात प्रकरणी सुनील टिंगरेंचं नाव कसं समोर आलं? 

हेही वाचा..“बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा”, पाच बांगलादेशींना अटक केल्यानंतर महेश लांडगे आक्रमक 

हेही वाचा..“सुप्रिया सुळेंमुळे अनेकजण पक्ष सोडताहेत”, शरद पवारांच्या लेडी जेम्स बॉंडचा गंभीर आरोप 

हेही वाचा…“छगन भुजबळांना आता आवरलं पाहिजे”, भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपात प्रचंड नाराजी