IMPIMP
Junnar Vidhansabha Junnar Vidhansabha

तिघांचं भांडणं अन् चौथ्याचा लाभ ? जुन्नर विधानसभेची निवडणुक यंदा लक्ष्यवेधी ठरणार ?

पुणे : लोकसभा निवडणुकीचा हंगाम संपला असून राज्यात पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचा शिमगा सुरू होणार आहे. लोकसभेप्रमाणचे विधानसभा निवडणुकीत देखील महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करण्यासाठी महायुतीची डोकेदुखी वाढली होती. तीच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीत देखील होण्याची शक्यता आहे. कारण मागच्या निवडणुकीपेक्षा राज्यात यंदा राजकीय चित्र वेगळं तयार झालं आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातून यंदा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी पुन्हा निवडणुक लढविण्याचे संकेत दिले आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटातील माजी आमदार शरद सोनवणे यांनी देखील याची जय्यत तयारी सुरू केली आहे. तर भाजपच्या आशा बुचके मागील काही शतकापासून विधानसभेची निवडणुक लढवत आहेत. आता हे तिघेही महायुतीत असल्याने जागावाटपाचा मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा..विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर, ‘या’ पक्षातील आमदारांची मुदत संपली 

तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये जुन्नरची जागा ही शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. कारण मागील २०१४ सोडलं तर २००४, २००९ आणि २०१९ मध्ये याठिकाणाहून राष्ट्रवादीचा आमदार निवडून गेला आहे. २०१४ साली मनसेच्या तिकीटावर निवडणुक लढवलेले शरद सोनवणे हे देखील सध्या महायुतीत आहेत. त्यामुळे याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा एकही मोठा नेता शिल्लक राहिलेला नाहीय. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीत ही जागा शरद पवारांनाच आतापर्यंत मिळत आलीय. त्यामुळे याठिकाणी शरद पवार गटाचा उमेदवार फिक्स मानला जात आहे.

यातच राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आमदार अतुल बेनके यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेनके यांना पर्याय म्हणून शरद पवारांनी देखील मोठी खेळी करण्यास सुरूवात केली आहे. याठिकाणी शरद पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्यशील शेरकर यांचं नाव समोर येत आहे. १२ जानेवारी झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवारांनी स्वत: विघ्नहर साखरकारखान्याच्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून शेरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजत आहे. अशातच सत्यशील शेरकर यांनी देखील विधानसभेची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा..विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनी कसली कंबर, गुपचूप बैठका अन् दिल्लीत बरच काही 

दुसऱ्या बाजूला महायुतीत ही जागा विद्यमान आमदार असल्याने अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु शरद सोनवणे तसेच आशा बुचके यांनी मागील काही वर्षांपासून विधानसभेची निवडणुक लढवत आहेत. मध्यंतरी शरद सोनवणे यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सोन्याचा मंदिर देखील उभारण्याची घोषणा केली होती. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या आशा बुचके यांना २०१९ ची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. याचा फायदा अतुल बेनके यांना झाला होता. याआधी देखील आशा बुचके यांनी २०१४ आणि २००९ साली शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान,  महायुतीत असलेल्या अतुल बेनके, शरद सोनवणे आणि आशा बुचके असे दिग्गज नेते असतांनाही अलिकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना तब्बल ५१,३९३ मतांचं लीड मिळालं आहे. तर मागच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता अतुल बेनके यांना ७४,९५८, शरद सोनवणे यांना ६५,८९०, तर आशाताई बुचके यांना ५००४१ मतं पडली होती. त्यावेळी तिघंही एकमेकांच्या विरोधात लढले होते.  इतकं असून देखील याठिकाणी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांना त्यांना लीड देता आलं नाही. त्यामुळे याठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

READ ALSO :

हेही वाचा..लोकसभेत पराभव तरी सुप्रिया सुळे अन् नंतर सुनेत्रा पवारांनी घेतली एकाच वेळी खासदारकीची शपथ 

हेही वाचा..संसदेत खासदारकीची घेतली शपथ, त्यानंतर सुप्रिया सुळेंनी लिहिलं ‘ते’ पत्र 

हेही वाचा…“निलेश लंकेंनी संसदेत फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ”, विखे पाटलांना दिलं सनसणित प्रत्युत्तर

हेही वाचा..भाजपला सर्वात मोठा धक्का, जनसंघापासून काम करणाऱ्या ‘या’ महिला नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश 

हेही वाचा..“आरक्षणाचा लाभ घेऊन आम्ही सक्षम झालो, आता आरक्षण सोडतोय”, या गटाने आरक्षणाचा लाभ सोडला ? 

Leave a Reply