IMPIMP
Congress Leader Congress Leader

कॉंग्रेसची ताकद वाढली, ‘सहा’ आमदारांनी मध्यरात्री कॉंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील सर्वच राजकीय चित्र बदलत चाललं आहे. निवडणुकीत लोकांनी कॉंग्रेसला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले, यातच आता दुसऱ्या पक्षातील आमदार देखील कॉंग्रेसमध्ये येत असल्याचे दिसत आहेत. यातच तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांना कॉंग्रेसने मोठा धक्का दिला आहे. भारत राष्ट्र समितीच्या विधान परिषदेच्या सहा आमदारांनी मध्यरात्री कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राज्यात आता पक्षाची ताकद वाढल्याचे दिसत आहे.

हेही वाचा…“बहिणीला विधानपरिषद मिळाली, आता भावाला देखील राज्यसभा मिळणार” 

याआधी केसीआरचे अत्यंत विश्वासू आणि बीआरएसमधील तिसऱ्या क्रमाकांचे नेते केशव राव यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राज्यसभेची खासदारकी देखील सोडली. यानंतर आता विधान परिषदेतील सहा आमदारांनी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंध रेड्डी दिल्ली दौऱ्यानंतर रात्री परतल्यावर त्यांनी त्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. हा प्रवेश सोहळा रात्री एक वाजता झाल्याचे समजत आहे.

हेही वाचा..“प्राधिकरणाच्या मालमत्ता होणार फ्री होल्ड ;” महेश लांडगे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सामंताचं उत्तर 

चंद्रशेखर यांचे विधानसभेतील संख्याबळही कमी झाले आहे. याआधीच विधानसभेतील सहा आमदारांनी देखील त्यांची साथ सोडली होती. त्यावरून आता विधानसभेच्या निवडणुकीत बीआरएसला ११९ पैकी केवळ ३९ जागा मिळाल्या होत्या. त्यातून सहा आमदारांनी साथ सोडल्यानंतर त्यांचे संख्याबळ ३३ पर्यंत खाली आले आहेत. तर विधान परिषेदत २५ जागा होत्या. त्यातील सहा आमदारांनी साथ सोडल्याने त्यांच्याकडे आता फक्त १९ आमदार शिल्लक राहिले आहेत.

दरम्यान बीआरएससचे नेते, आमदार केटी रामा राव यांनी आमदारांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेस संविधानाची रक्षा करत असल्याचा दावा करत असेल तर बंडखोरी केलेल्या आमदारांनी पदाचा राजीनामा द्यायला हवा. असेही त्यांनी सांगितले आहे.

READ ALSO :

हेही वाचा…विधानसभेआधीच ठाकरे गटाकडून भाजपला फोडण्यास सुरूवात, ६ ते ८ नगरसेवक ठाकरे गटात करणार प्रवेश 

हेही वाचा…“रोहित शर्मासह, सुर्यकुमार यादव, जैस्वाल, दुबेंचा सत्कार,” द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो

हेही वाचा…पुण्यात झिका व्हायरसचा धुमाकुळ, श्रीनाथ भिमालेंनी आयुक्तांना लिहिले पत्र 

हेही वाचा…“रोहित शर्मा, विराट कोहलींची मिरवणूक मुंबईच्या बेस्ट बसवरून काढा”, रोहित पवारांची मागणी 

हेही वाचा…कट्टर विरोधक, लोकसभेला साथ दिली, आता विधानसभेचं वेध, कॉंग्रेस जागा सोडणार का ? 

Leave a Reply