IMPIMP
The swearing-in ceremony was done and the accounts were distributed, now the first session The swearing-in ceremony was done and the accounts were distributed, now the first session

शपथविधी झाला, खातेवाटपही झालं, आता पहिलं अधिवेशन २४ जूनपासून.. वादळी ठरणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा अलिकडेच शपथविधी झाला. त्यानंतर शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं खातेवाटपही पुर्ण होऊन त्यांनी आता कामाला देखील सुरूवात केली. आता अठराव्या लोकसभा अध्यक्षांची निवड बाकी राहिली आहे. त्याआधीच पावसाळी अधिवेशनाची तारीख समोर आलीय.

हेही वाचा..“जीवंत असेपर्यंत शरद पवारांसोबत राहणार”, बीडच्या बजरंग सोनवणेंनी मिटकरींना दिलं प्रत्युत्तर

नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल ७२ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यातच आता लोकसभा अध्यक्ष कोण होणार ? याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. त्याआधी अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार असून ते ३ जूलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतीचं अभिभाषण होईल. त्यानंतर २५ ते २६ जुलैला नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाणार आहे.

हेही वाचा..मुरलीधर मोहोळांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार 

तर राज्यसभेचं २६४ वं अधिवेशन येत्या २७ जून रोजी सुरू होऊन ते ०३ जूलैपर्यंत चालणार आहे. मागच्या सरकारमध्ये विरोधी पक्षांची संसदेत कमी खासदार निवडून आले होते. तर भाजपला पुर्ण बहुमत मिळालं होतं. परंतु यावेळेस विरोधकांची संसदेत मोठी ताकद असून सत्ताधारी पक्षाला देखील यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या तिसऱ्या काळातील हे पहिल अधिवेशन चांगलचं गाजण्याची शक्यता आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“मोदी है तो मुनकीन है, मोदी की गॅरंटी”, असं वातावरण तयार केलं, पण घडलं काय ?” शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

हेही वाचा…“कोकण आणि नाशिकबाबत समझोता झालाय”, विधान परिषदेच्या जागांचा घोळ ठाकरेंनी निकाली काढला 

हेही वाचा..अजित पवार गटाकडून राज्यसभेवर सुनेत्राताई पवार, की पार्थ पवार, की तिसरा कोणीतरी?

हेही वाचा…मंचरमध्ये महाविकास आघाडीत मोठा राडा, कोल्हेंनी निकमांचा ‘भावी आमदार’ उल्लेख केला अन्… 

हेही वाचा…भाजप विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार ? अजित पवार अन् शिंदेंचं काय होणार ?