IMPIMP
Then all patriots will stand behind Narendra Modi", Devendra Fadnavis Then all patriots will stand behind Narendra Modi", Devendra Fadnavis

“तर सर्व देशभक्त नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभे राहतील”, देवेंद्र फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

नाशिक :  सध्या नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामामुळे विरोधकांना या निवडणुकीमध्ये उत्तर देता येत नाही. त्यामुळे त्यांना आता कोणीही मतदान करायला तयार नाही. हे लक्षात आल्यानंतर आता त्यांची भारतातील मतं संपली असून पाकिस्तानमधून मत मागण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. याठिकाणी राहुल गांधी यांच्यासाठी पाकिस्तानमधून मंत्री ट्विट करतात. अरविंद केजरीवाल यांच्यासाठी पाकिस्तानचे मंत्री ट्विट करतात. यातच परवा उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता. असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा…मोदींच्या सभेसाठी शरद पवारांचं नाव झाकलं, शरद पवार गटाने मोदींना डिवचलं 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सुरूवातीपासून राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळी ठाकरेंवर निशाणा साधला. याठिकाणी सर्व देशभक्त मोदी यांच्या पाठीशी उभे राहतील, असेही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा…“शिंदे, अन् अजितदादांनी कांद्याची माळ घालून मोदींचे स्वागत करावे” 

दरम्यान, यातच देवेंद्र फडणवीस यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्नावरही भाष्य केलं. यातच नाशिकसह नगर, मराठवाड्यामध्ये आम्हाला तहाण भागवायची आहे. त्याकरता पश्चिम वाहिन्यांचे पाणी आणण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे याठिकाणी फक्त नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद आपल्याला हवे आहेत. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा..मुरलीधर मोहोळांच्या पथ्यावर पडणार वाढलेली मतदानाची टक्केवारी?

हेही वाचा…“शरद पवारांनी मोदींशी चर्चा केली असती तर सुळेंना मंत्री पद दिलं असतं, पण….” कोणी केलं हे विधान 

हेही वाचा…“मोदी साहेबांच्या हातातून सत्ता काढून घ्या”, शरद पवारांची मोदींवर जोरदार टिका 

हेही वाचा…शुभेच्छा देण्याची लयच घाई..! निकालाच्या आधीच लागले ‘भावी खासदार’ म्हणून बॅनर्स 

हेही वाचा…अखेर प्रफुल्ल पटेल विरोधकांसमोर झुकले, मोदींना जिरेटोप घालणं पटेलांच्या आलं अंगलट