IMPIMP
There are indeed gods, so for whom do they meditate There are indeed gods, so for whom do they meditate

घोंचू..! “मोदी खरोखरच देव आहेत, मग ते ध्यान कुणासाठी करतात ?”

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्याचा निकाल लगेचच ०४ जुनला लागणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून तामिळनाडूतील कन्याकुमारीच्या किनाऱ्यावरील स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देऊन ध्यानधारणेला सुरूवात केली आहे. याठिकाणी तीन दिवस नरेंद्र मोदी ध्यानधारणा करणार आहेत. यावरून विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली आहे. अशातच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तर घोंचू असा उल्लेख करत मोदींवर निशाणा साधला आहे.

 हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमधील शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अक्षरश: झापले ! प्रकरण काय ? 

2019 साली देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापुर्वी केदारनाथ दर्शनाला गेले होते. त्याआधी २०१४ साली ते प्रतापगडावर गेले होते. अन् आता ते कन्याकुमारीला आले आहेत. यावरून मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की त्यांना यावर्षी कांन्समध्ये नामांकन का मिळाले नाही. काही दिवसापुर्वी मोदींनी स्वत: बरोबरी देवाशी केली होती. तर मोदी खरोखर देवच असतील तर ते ध्यान कोणासाठी आणि कशासाठी करत आहेत ? असा सवालही आंबेडकरांनी मोदींना केलाय.

हेही वाचा..“गृहमंत्र्यांचं पुण्यासारख्या महत्वाच्या शहराकडे लक्ष नाही”,सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टिका 

दरम्यान, यंदा लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यात मतदान होत आहे. सहा टप्पे पुर्ण झाले असून शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. या निवडणुकीत विरोधकांची तसेच सत्ताधारी भाजपची चांगलीच कसोटी लागणार आहे. भाजपने आधीच चारशो पार चा नारा दिला आहे. तर विरोधात असलेली इंडिया आघाडीने देखील चांगलाच प्रचार केलाय. त्यामुळे येत्या ०४ जूनला कुणाची सत्ता स्थापन होणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“तर हे मंत्री नेमके कोणते उद्योग करतात? विरोधकांचा सरकारवर निशाणा 

हेही वाचा..नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुक रंजक होणार, ठाकरे अन् शिंदें आमनेसामने

हेही वाचा…देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतलं रामललांचे दर्शन 

हेही वाचा..“..तर विशाल अग्रवालला वाचवणारी सगळी नावं समोर येतील”, पुणे अपघाताबाबत मोठी अपडेट समोर 

हेही वाचा.. पोर्श कारअपघात प्रकरणी सुनील टिंगेर अडचणीत, जगदीश मुळीकांची प्रकरणावर चुप्पी का ?