IMPIMP
vasant more vasant more

वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश , विधानसभेसाठी ठाकरेंकडे मोरेंनी दिलेल्या दोन पर्यायात इच्छूकांची प्रचंड गर्दी

पुणे : मनसेला जय महाराष्ट्र करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून लोकसभा लढवणारे माजी नगरसेवक वसंत मोरे आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत. वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील वसंत मोरे यांचं स्वागत केलं आहे. अशातच वसंत मोरे ०९ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार असून विधानसभा निवडणुक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता विधानसभेसाठी वसंत मोरे यांनी दोन मतदारसंघ निवडले असल्याचंही समजत आहे.

लोकसभा निवडणुकीपुर्वी वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. तर वसंत मोरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेससह, ठाकरे गट आणि कॉंग्रेसने देखील पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी वंचितचा रस्ता पकडला होता. परंतु लोकसभेत वसंत मोरे यांना पराभावाचा सामना करावा लागला. राज्यात आता आगामी काही महिन्यात विधानसभेची निवडणुक होऊ घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांनी यावेळी विधानसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून येत्या ०९ जूलै रोजी ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचेही सांगितले आहे.

हेही वाचा…“मिलिंद नार्वेकरांमुळे कॉंग्रेसचा उमेदवार पडणार”?शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा 

यातच आता पक्ष प्रवेश करणार असून बाकीच्या चर्चा पुढे करू. वंचितमध्ये गेलो होतो. मात्र मतदारांनी मला स्विकारलं नाही. या अगोदर शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो. माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतो आहे. असं म्हणत मला दोन पर्याय आहेत. खडकवासला आणि हडपसर या दोन्हीकडून विधानसभा लढू शकतो. जनतेसाठी,जनतेच्या हितासाठी काम करत राहू. शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद अधिक असून १० नगरसेवक आहेत. अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी भेटीनंतर दिली आहे.

“अजितदादा माझे चांगले मित्र, सरकार यावं अन् मी मंत्री व्हावं,” विजय शिवतारेंचं विधान 

वसंत मोरे यांनी दावा सांगितेल्या हडपसरची जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. येथून पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधीच फिक्स केली आहे. तर शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी देखील निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राहिलेले बाळासाहेब शिवरकर यांनी देखील निवडणुक लढवण्यासाठी दंड थोपाटले आहेत. या दोघांच्या भांडणात  वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर त्यांना उमेदवारी मिळेल का ? अशी शंका उपस्थित केली जात आहे. याआधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वसंत मोरे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

दुसऱ्या बाजूला खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर विद्यमान आमदार असून त्यांनी पुन्हा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटालाच येण्याची शक्यता असून याठिकाणाहून सचिन दोडके यांनी आधीच तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत वसंत मोरेंसाठी महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ही जागा सुटणे मुश्लिल वाटू लागले आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करून विधानसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु त्यांना कुठून उमेदवारी मिळणार ? ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा..इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, अजित पवार गट काय भूमिका घेणार ? 

हेही वाचा..शिंदे अन् ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त भेट, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ 

हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला गळती सुरूच, अजित पवारांनी आणखी एक धक्का 

हेही वाचा…पर्वतीमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच, श्रीनाथ भिमाले की माधुरी मिसाळ ? एकच चर्चा

हेही वाचा…जरांगे पाटलांच्या जीवाला धोका, झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा बांधवांची मागणी 

Leave a Reply