IMPIMP
There is no MLA in the constituency, yet Thackeray's candidate is victorious, see what actually happened There is no MLA in the constituency, yet Thackeray's candidate is victorious, see what actually happened

मतदारसंघात एकही आमदार नाही, तरीही ठाकरेंचा उमेदवार विजयी, पाहा नेमकं काय घडलं ?

नाशिक : लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या नाशिक मतदारसंघात ठाकरेंच्या राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली. सुरूवातीपासूनच याठिकाणी उमेदवारीवरून महायुतीत मोठा घोळ बघायला मिळाला. महाविकास आघाडीकडून ठाकरेंना उमेदवार आधीच जाहीर करून दिला. त्यानंतर महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आपली उमेदवारी आधीच दावा ठोकला. परंतु याठिकाणी भाजपने देखील तयारी सुरू केली. तर अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचं नाव देखील समोर आलं. सरतेशेवटी महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला. परंतु जागा ताब्यात ठेवणं त्यांना यश मिळालं नाही.

हेही वाचा..ओबीसींसाठी छगन भुजबळ पुन्हा मैदानात, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार ‘ही’ मागणी 

नाशिक लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर त्यांच्यापुढे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर अपक्ष म्हणून शांतीगिरी महाराज देखील आखाड्यात उतरले. मात्र याठिकाणी राजाभाऊ वाजे यांनी मोठा विजय मिळवला.  विशेष करून याठिकाणी ठाकरेंच्या विधानसभेचा एकही आमदार नसतांना ही जागा आपल्या ताब्यात ठेवली आहे.

हेही वाचा…“वेड्यांचा बाजार भरवणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही,” म्हणून.. दिलीप वळसे पाटलांनी आव्हाडांना सुनावलं

नाशिक  मतदारसंघात नाशिक मध्य, नाशिक पुर्व, आणि नाशिक पश्चिम या मतदारसंघात भाजपचे आमदार, तर सिन्नर आणि देवळाली कॅम्प मध्ये अजित पवार गटातील आमदार तर फक्त इगतपुरी मतदारसंघात कॉंग्रेचा आमदार आहे. राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरमधून १ लाख, २८ हजार, नाशिकमध्य मधून ३ हजार ८०६, इगतपुरीमधून ४३ हजार ५३३, देवळालीमधून २७ हजार १३६ मतांचा लीड घेतला होता. तर हेमंत गोडसे यांना नाशिक पुर्व मधून १० हजार ४००, नाशिक पश्चिम मधून ३१ हजार २१० मतांचा लीड मिळाला होता.

दरम्यान, मागच्या लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ५०.५६ टक्के मत पडली होती. तर यानिवडणुकीत मतांच्या टक्केवारीत १३.८१ टक्क्यांची घट झालीय. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यावर्षी २५.४८ टक्के मत अधिकची पडली आहेत. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारलीय.

READ ALSO :

हेही वाचा…नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत वाढली रंगत , अजितदादाच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा 

हेही वाचा..“तुकाराम मुंडेंची आता अमेरिकेत किंवा रशियात बदली करा,” विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला 

हेही वाचा…‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

हेही वाचा..चिखलात माखलेले पाय पटोलेंनी कार्यकर्त्यांकडुन घेतले धुवून, व्हिडीओ व्हायरल 

हेही वाचा…“फडणवीसांनी मला या सगळ्या मोठ्या संकटातून वाचवलं “, नरेश म्हस्केंनी सांगितला विधान परिषदेचा किस्सा 

Leave a Reply