मुंबई : उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नागपुर येथे जाणार आहे. यावेळी माझ्या मतदार संघातील लोकांशी भेटीगाठी घेणार आहेत. तसेच कोर्टाची परवानगी घेऊन संपुर्ण विदर्भामध्ये पक्षाचं काम पुन्हा सुरू करणार आहे. असं विधान राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. ते पहिल्यांदाच आज मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले असता बोलत होते.
सुप्रिया सुळेंना विरोधी पक्षात आवडे…! म्हणाल्या, सरकारवर टिका करण्यास फार…
नागपुर तसेच मराठवाड्यात सध्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात सध्या गोंधळ सुरू आहे. यात अनेक गट बघायला मिळत आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले की, या संपुर्ण प्रकरणाबाबत महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित बसून यावर निर्यण घेतला जाईल. तसेच पाचही ठिकाणी महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. असंही त्यांनी सांगितले आहे.
नवाब मलिकनंतर त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल, फ्रेंच मैत्रिणीही गुन्हात अडकली
तसेच विदर्भातील अन् तसेच विकासासंदर्भातील अनेक प्रश्न सध्या प्रलिंबत आहेत. यासाठी लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन विकासासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- आजोबांकडून सतत अन्याय होत असल्याची भावना, त्यामुळेच पार्श पवार अन् शंभुराज देसाईंची भेट
- “एका बाजूला सन्मानाचे पोस्टर, तर दुसऱ्या बाजूला झुकते माफ..! मोदींच्या मुंबईतील पोस्टरची सर्वत्र चर्चा
- नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा..! तब्बल 38, 000 कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन अन् पायाभरणी
- मोदींचा मुंबई दौरा…! 5 वरिष्ठ पोलीस उपआयुक्त 27 एसीपी, 71 पोलीस निरीक्षक, 397 अधिकारी अन् अडीच हजार पोलीस तैनात
- पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी वाढली..! बिनविरोध की थेट लढत होणार?