मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून भाजपकडून मिशन मुंबई महापालिकेचा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. तसेच आज सायंकाळी बीकेसी मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
“आई बहिणींची अब्रु आमच्यासाठी सर्वतोपरी, शिवसेना कायम उभी राहणार”
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सांयकाळी मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे लोकार्पण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुल, एमएमआरडीए मैदान, मेट्रो मार्गिका 7, गुंदवली स्थानक ते मोगरापाडा मेट्रो स्थानक या ठिकाणी पंतप्रधानाचा दौरा आयोजिक केला आहे. त्यामुळे या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, दहशतवादी हल्ल्याबाबत सतर्कता जारी करण्यात आली आहे. ड्रोन आणि छोट्या विमानाने दहशतवादी हल्ला करू शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय आकाशात ड्रोन, पॅरा ग्लायडर किंवा छोटी विमाने उडवण्यास बंदी करण्यात आली आहे.
“आई बहिणींची अब्रु आमच्यासाठी सर्वतोपरी, शिवसेना कायम उभी राहणार”
त्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी काल ट्विट करत मुंबई दौऱ्याची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रू. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल. असंही त्यात मोदींनी म्हटलं आहे.
“भाजपची रणनीती माणसं फोडा अन् मत मिळवा, नाशिकमध्येही तेच झालं”
दरम्यान मोदींच्या मुंबई दौऱ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे. मुंबई नगरीत आपले मन:पुर्वक स्वागत आहे. नरेंद्र मोदी उद्या आपल्या शुभ हस्ते मुंबईतील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपुजन होणार असून या माध्यमातून मुंबईचा नक्कीच कायापालट होणार आहे , हा विश्वास आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Read also
- मोदींचा मुंबई दौरा…! 5 वरिष्ठ पोलीस उपआयुक्त 27 एसीपी, 71 पोलीस निरीक्षक, 397 अधिकारी अन् अडीच हजार पोलीस तैनात
- पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी वाढली..! बिनविरोध की थेट लढत होणार?
- सुप्रिया सुळेंना विरोधी पक्षात आवडे…! म्हणाल्या, सरकारवर टिका करण्यास फार…
- नवाब मलिकनंतर त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल, फ्रेंच मैत्रिणीही गुन्हात अडकली
- पिंपरी चिंचवड पोटनिवडणुक जगतापांच्याच कुटुबांतील उमेदवार, राष्ट्रीवादीच्या भूमिकेकडे लक्ष्य..