पुणे : केंद्रीय निवडणुक आयोगाने पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी होणार आहे. त्यातच आता कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड या विधान सभेत कोण उमेदवार उभा राहणार याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान.! राष्ट्रवादी अन् भाजप
अलिकडेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबापेठ विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं गंभीर आजारानं निधन झालं. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सहा महिन्याच्या आत पोटनिवडणुक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजप पुन्हा आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का ? त्याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“सत्यजित तांबेंनी समर्थन मागितलं तर..”; बावनकुळेंनी स्पष्ट केलं, गोंधळात नाशिक
लक्ष्मण जगताप यांच्या निधनांनंतर त्याजागी पोटनिवडणुक होणार त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी अश्विनी की बंधू शंकर जगताप या दोघांपैकी कोण निवडणुक लढेल, बिनविरोध होईल की राष्ट्रवादी निवडणुक लढवेल याची चर्चा असताना परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेऊ असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. तर कसबा पेठ विधानसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच सांगितले आहे.
” मास्टरस्ट्रोक..! दावोस मधून प्रकल्प आणणार आणि गुजरातला पाठवून गिप्ट देणार”
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेने ऋुतजा लटके यांना उमेदवारी दिल्याने त्याठिकाणी भाजपने आपला उमेदवार माघारी घेतला. त्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणुक बिनविरोध झाली. त्यामुळे पुण्यातील य़ा दोन विधानसभेच्या मतदार संघातही पोटनिवडणुक बिनविरोध होईल की जोरदार लढत होईल. याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून आहे.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम अर्ज दाखल करण्याची मुदत : ७ फेब्रुवारी २०२३ अर्जांची छाननी : ८ फेब्रुवारी अर्ज मागं घेण्याची मुदत : १० फेब्रुवारी मतदान : २७ फेब्रुवारी मतमोजणी आणि निकाल : २ मार्च
Read also
- “आई बहिणींची अब्रु आमच्यासाठी सर्वतोपरी, शिवसेना कायम उभी राहणार”
- “आई बहिणींची अब्रु आमच्यासाठी सर्वतोपरी, शिवसेना कायम उभी राहणार”
- “भाजपची रणनीती माणसं फोडा अन् मत मिळवा, नाशिकमध्येही तेच झालं”
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर.! पुढील सुनावणी ३ आठवड्यांनी
- जगातल्या सर्वोत मोठ्या पक्षाला 5 उमेदवार मिळेना, भाजपचा शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीत अपक्षांना पाठिंबा