पुणे : मागील काही वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या आहेत. महापालिका निवडणुका आणि प्रभाग रचना यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी पार पडली. मागच्या सुनावणी प्रमाणेच याही सुनावणी कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने ही सुनावणी आता तीन आठड्यांनी होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकां आणखी लांबणीवर गेल्या आहेत.
“शिंदे-ठाकरे गट एकत्र आल्यास भाजप युती करणार का ?” जे.पी. नड्डांनी स्पष्टच सांगितलं
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी ठेवण्यात आला. परंतु यावर कोणताही निर्णय न घेता. यावर आता पुढील सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करण्यास सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे. त्यामुळे महापालिक निवडणुका नेमक्या कधी होणार याचे उत्तर या सुनावणीवर आता अवलंबुन आहे.
नाशकात नवा ट्विट…! सत्यजित तांबेंनी काॅंग्रेस सोडली..? पक्षाची कारवाई होण्याअगोदर
92 नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही याच याचिकेत समाविष्ठ करण्यात आला आहे. हे प्रकरण गेल्या बऱ्याच काळापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलिंबित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने लांबणीवर जात आहे. या प्रकरणातील शेवटचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने यापुर्वी 28 जुलै 2022 रोजी दिला होता. याच सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला परवानगी देण्यात आली होती. पण त्यानंतर 92 नगरपरिषदांचा प्रश्न कोर्टात प्रलंबित होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले.
“फडणवीसांनी घोडा सजवला अन् त्यावर तुम्ही शिंदेंना बसवलं”; जे. पी. नड्डाचं उत्तर, म्हणाले की,…
दरम्यान, पुणे, पिंपरी- चिंचवड, मुंबई सह राज्यातील 23 महापालिकांचा कार्यकाळ संपला आहे. या सर्व महापालिकांवर प्रशासकांची नेमणुक करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड या महापालिकांचा कार्यकाळ संपून जवळपास दहा महिने झाले असतानाही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यातच महाविकास आघाडीने केलेली त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला आहे.
Read also
- जगातल्या सर्वोत मोठ्या पक्षाला 5 उमेदवार मिळेना, भाजपचा शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीत अपक्षांना पाठिंबा
- कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान.! राष्ट्रवादी अन् भाजप
- “सत्यजित तांबेंनी समर्थन मागितलं तर..”; बावनकुळेंनी स्पष्ट केलं, गोंधळात नाशिक
- ” मास्टरस्ट्रोक..! दावोस मधून प्रकल्प आणणार आणि गुजरातला पाठवून गिप्ट देणार”
- राज ठाकरेंच्याविरोधात अटक वाॅंरट जारी, जामीन मंजूर, 500 रूपयाचा दंड, प्रकरण काय ?