नाशिक : आगामी काही दिवसांनी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी मतदान होणार आहे. पाच ठिकाणी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी निवडणुक होत असून त्यासाठी उमेदवारांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. मात्र यावेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी पलटी घेतल्याने नाशकात मोठा गोंधळ बघायला मिळाला. मग त्याठिकाणी आता डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना अद्यापही भाजपने पाठिंबा जाहीर केला नाही. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केलं आहे.
सत्यजित तांबे यांनी अजून पर्यंत कुठलंही समर्थन मागितलेलं नाही. पंरतु जर सत्यजित तांबे यांनी आमच्याकडून समर्थन मागितलं तर केंद्रातील आणि राज्यातील कार्यकाराणीत याबद्दल आम्ही समर्थन मागण्यासाठी प्रयत्न करू. परंतु अजूनही त्यांनी कुठलंही समर्थन मागितलेलं नाही. तसेच नाशिक मध्ये भाजप सध्या अपक्षांसोबत आहे आणि तो काळ ठरवले. अस चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
“अतुल भातखळकरांसारख्या लोकांना विधानसभेऐवजी आश्रमात पाठवा”, राष्ट्रवादीने डिवचलं
सध्या काॅंग्रेस पक्षामध्ये बुथ लेवल पर्यंत कुणीही काम करण्यासाठी तयार नाही आहे. काॅंग्रेसकडे नेतृत्व नसल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे. तसेच 2047 पर्यंत काॅंग्रेस पक्षाला अच्छे दिवस येणार नसल्याचं कार्यकर्त्यांनाही समजलं आहे. त्यामुळे 30 वर्ष काॅंग्रेसमध्ये राहुन कुणालाही आपलं आयुष्य खर्ची घालायचं नाही. तसेच काॅंग्रेसमध्ये आमराचा मुलगाच आमदार, खासदाराचा मुलगाच खासदार, तसेच नेत्याचा मुलगाच नेता बनू शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नेते आपापल्या मुलाला प्रमोट करण्याच्या चक्करमध्ये आहेत. त्यामुळे लहान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. असा टोलाही त्यांनी हाणला आहे.
Read also
- ” मास्टरस्ट्रोक..! दावोस मधून प्रकल्प आणणार आणि गुजरातला पाठवून गिप्ट देणार”
- राज ठाकरेंच्याविरोधात अटक वाॅंरट जारी, जामीन मंजूर, 500 रूपयाचा दंड, प्रकरण काय ?
- “शिंदे-ठाकरे गट एकत्र आल्यास भाजप युती करणार का ?” जे.पी. नड्डांनी स्पष्टच सांगितलं
- नाशकात नवा ट्विट…! सत्यजित तांबेंनी काॅंग्रेस सोडली..? पक्षाची कारवाई होण्याअगोदर
- “फडणवीसांनी घोडा सजवला अन् त्यावर तुम्ही शिंदेंना बसवलं”; जे. पी. नड्डाचं उत्तर, म्हणाले की,…