मुंबई : महाराष्ट्रा बाहेर गेलेल्या प्रकल्पावरून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी आरोपांची राळ उठवली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांवरून चांगलीच जुंपली. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येेथे झालेल्या आंतराराष्ट्रीय आर्थिक परिषदेतून जवळपास 1 लाख 37 हजार कोटी रूपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यावरून आता काॅंग्रसेने त्यांना डिवचलं आहे.
“अतुल भातखळकरांसारख्या लोकांना विधानसभेऐवजी आश्रमात पाठवा”, राष्ट्रवादीने डिवचलं
जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात आले. या परिषदेत उद्योगपतींशी महाराष्ट्राला पहिली पंसती देत तब्बल 1 लाख 37 हजार कोटी रूपयांची गुंतवणुक केली. यावरून मास्टरस्ट्रोक, दावोस मधून प्रकल्प आणणार आणि गुजरातला पाठवून गिप्ट देणार असा खोचक टोला काॅंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी हाणला आहे.
संकल्प करतो तोच इतिहास रचतो, सर्व कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून द्यावे;
दरम्यान या परिषदेत इस्त्रालयच्या राजुरी स्टील्स अॅंड अलॉंईचजा चंद्रपुऱ जिल्ह्यातील मूल येथे 600 कोटी रूपयांचा स्टील प्रकल्प होणार असून त्यात 1 हजार रोजगार मिळणार आहे. तसेच पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट एयो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे 400 कोटी रूपयांचा प्लास्टिक ऑटोमोटटिव्हज प्रकल्प असून त्यात 2 हजार रोजगार निर्मीती होणार आहे.
“शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविमा मिळाला नाही, त्यांना पीकविमा द्या”, राष्ट्रवादीची मागणी
त्याचबरोबर भद्रावती (जि.चंद्रपूर) येथे २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्याची घोषणा न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन कंपनीने केली आहे.या प्रकल्पातून १५ हजार रोजगारनिर्मिती होणार असून विदर्भाच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे दरवर्षी ५ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचा हा कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प प्रस्तावित आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये कोळसा गॅसिफिकेशन ही काळाची गरज असून हे गॅसिफिकेशन तंत्रज्ञान सिंथेसिस गॅस निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
मास्टरस्ट्रोक…
दावोस मधून प्रकल्प आणणार आणि गुजरातला पाठवून गिफ्ट देणार.!! 😂— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) January 18, 2023
Read also
- राज ठाकरेंच्याविरोधात अटक वाॅंरट जारी, जामीन मंजूर, 500 रूपयाचा दंड, प्रकरण काय ?
- “शिंदे-ठाकरे गट एकत्र आल्यास भाजप युती करणार का ?” जे.पी. नड्डांनी स्पष्टच सांगितलं
- नाशकात नवा ट्विट…! सत्यजित तांबेंनी काॅंग्रेस सोडली..? पक्षाची कारवाई होण्याअगोदर
- “फडणवीसांनी घोडा सजवला अन् त्यावर तुम्ही शिंदेंना बसवलं”; जे. पी. नड्डाचं उत्तर, म्हणाले की,…
- फडणवीसांची कुस्तीच्या आखाड्यात “सनातन धर्म की जय ची घोषणा”; पवारांची नाराजी, राष्ट्रवादी अन् भाजपची जुंपली