बीड : बीड मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासाबरोबरच शेतकऱ्यांना पीकविमा मिळणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविमा मिळाला नाही. त्यांना पीकविमा मिळावा तसेच शेतकऱ्यांना नवे जुने करून नवीन पीक कर्ज मिळण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीती सर्वसाधन बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली.
ठाकरे अन् शिंदे गटाकडून आयोगाकडे कागदपत्र सादर, ठाकरेंकडे 18 लाखांपेक्षा अधिक तर..
बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उंची वाढवणे व सुशोभिकरण करणे बाबत बीड नगर पालिकेने अंदाजपत्रक आराखडा तयार करणे व अभियंता नियुक्ती करून लवकरत लवकर निविदा काढणे अशी मागणीही त्यांनी केली. तसेच बीड पंचायत समिती आवारामध्ये स्व.आण्णासाहेब पाटील पुतळा बसवणे बाबतच्या प्रस्तावास मान्यता देऊन तात्काळ काम सुरु करणे. ग्रामीण व शहरी भागाच्या सुविधांसाठी पायाभूत कामे होणे गरजेचे आहेत त्यासाठी लागणारा निधी तरतूद करण्याची मागणी केली. ग्रामीण रस्त्यांची जोडणी गतिमान करणे, बीड शहरात सध्या सुरु असलेल्या सिमेंट रस्त्यांसाठी निधीची तरतूद करणे, अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांचे कामे सुरु आहेत कामात रस्त्यामध्ये लाईट पोल येतात. महावितरणच्या पोल शिफ्टिंग बाबत लागणार निधी मिळावा. असंही त्यांनी सांगितले.
बीड विधानसभा मतदारसंघात मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेली पाली येथील 33 के. व्ही. चे काम सुरु करावे, अंजनवती या ठिकाणी सुरु असलेले लाईट सबस्टेशनच्या कामासाठी आणखी जास्तीचा निधी मिळावा व लाईट सबस्टेशनचे काम गतीने व्हावे अशी मागणी केली. बीड व शिरूर कासार तालुक्यातील कृषी व सिंगल फेज डी.पी.देण्यात यावे. जिल्हाची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथील विकास कामांबाबतचे सर्व प्रश्न सोडवणे बाबत व मंजूर असलेल्या 23 कोटींच्या निधीची तरतूद होणे बाबत पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी यांच्यासह शासनस्तरावरून तात्काळ बैठक आयोजित व्हावी. शहराचे ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडेश्वरी देवस्थान, बीड पर्यटन विकास योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी नियोजन विभागाच्या वतीने प्रस्ताव सादर करणे बाबत चर्चा केली. बीड विधानसभा क्षेत्रातील तिर्थक्षेत्रांना ‘क’ दर्जा देणे बाबतही मागणी केली. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ्यांच्या विकासासंदर्भात असणाऱ्या योजनांसाठी वाढीव निधी मंजूर करण्यासंदर्भात यावेळी मागणी केली.
Read also
- “हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा महान शोध लावणारे धन्य ते शिंदे-फडणवीस सरकार”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “पक्षात होता तेव्हा पक्षाच्या घटनेवर शिंदे गटाने शिवसेनेवर आक्षेप का घेतला नाही”; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
- धनुष्यबाणावरील सुनावणी आणखी लांबणीवर..पुढील सुनावणी 20 जानेवारीला
- “निलेश राणेंसारखा घाणेरड्या वृत्तीचा माणुस या जगात कधी निर्माण झालेला नाही”
- “..तर उद्या शिंदे गटाचे वकीलही मीच मुख्य नेता असल्याचा दावा करतील”; ठाकरे गटाचा टोला