मुंबई : शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा ? याबाबत आज निवडणुक आयोगासमोर दोन्ही बाजूंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद झाला. शिंदे गटाचे वकिल जेठमलानी आणि ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावर आता निवडणुक आयोगाने कोणताही निर्णय घेतला नाही. तर आता पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे यासंदर्भात आता पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर पडली आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, या तारखेला होणार विस्तार?
निवडून आलेले आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेत. त्यामुळे लोकप्रतिनीधी आणि पक्ष वेगवेगळा आहे. कागदपत्रे खरी ठरली असतील तर ओळख परेड करा, तातडीने निर्णय देऊ नका. असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यावर पक्षातून एखादा मोठा गट लोकप्रतिनींसह बाहेर पडला तर त्यात बेकायदेशीर काय? असं म्हणत आमच्याकडे संख्याबळ जास्त असल्याने चिन्हाचा लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी जेठमलानी यांनी केली होती.
“धनुष्यबाण चिन्हाबाबत ठाकरे गटाचा बी प्लॅन तयार” आज महत्वाची सुनावणी
यातच कोर्टाच्या निकालाची प्रतिक्षा करा. पक्षात होता तेव्हा पक्षाच्या घटनेवर आक्षेप का घेतला नाही. असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला. तसेच पक्षाचा लाभ घेतला आणि परत लोकशाही नाही, म्हणता आतापर्यंतच्या निवडणुक प्रक्रियेवर निवडून आयोगाने आक्षेप घेतला नाही. म्हणजे आमची पक्षाची घटना कायदेशीर आहे. आमदार आणि खासदार हे पक्षाच्या नुसार निवडून येतात. पक्षाच्या धोरणांना मानून मतदार मतदान करतात. पक्षाची घटना ही योग्यच आहे. तिला आव्हान देता येऊ शकत नाही.आतापर्यंत उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत होते, मग आताच आक्षेप का? पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मुदतवाढ द्या. अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली.
“संजय राऊतांचं मनस्वस्थ ठिक नाही” चित्रा वाघ यांची राऊतांवर टिका
मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी बाहेर पडत आहेत. यामध्ये तथ्य आहे. आधीच्या त्याचपद्धतीने शिंदे गटाचे पदाधिकारी नेमले गेले होते. त्यामध्ये कोणतीही चुक नाही. मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी बाहेर पडत आहेत. त्याचपद्धतीने शिंदे गटाचे पदाधिकारी नेमले होते. त्यामध्ये कोणतीही चुक नाही. मोठ्या संख्येने लोकप्रतिनी बाहेर पडत आहेत. यामध्ये तथ्य आहे. आधीच्या निकालांच्या शिंदे गटाच्या वकिलांकडून दाखला दिला गेला.
Read also
- “निलेश राणेंसारखा घाणेरड्या वृत्तीचा माणुस या जगात कधी निर्माण झालेला नाही”
- “..तर उद्या शिंदे गटाचे वकीलही मीच मुख्य नेता असल्याचा दावा करतील”; ठाकरे गटाचा टोला
- ठाकरे अन् शिंदे गटाकडून आयोगाकडे कागदपत्र सादर, ठाकरेंकडे 18 लाखांपेक्षा अधिक तर..
- देशातील आर्थिक असमानता रोखण्यास मोदी सरकार अपयशी, १ टक्के अब्जाधीशांच्या ताब्यात देशातील ४० टक्के संपत्ती
- “आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता, मात्र…;” अजित पवारांची काॅंग्रेसवर नाराजी