नवी दिल्ली : ज्या लोकांना पक्षातून बाद केलेले आहे. ते लोक पक्षावर दावा करत असतील तर हे हास्यास्पद आहे. त्यामुळे उद्या शिंदे गटाचे वकील मीच मुख्य नेता असल्याचे म्हणतील. असा खोचक टोला शिवसेनेचे नेते अनिल देशमुख यांनी शिंदे गटावर लगावला. आज शिवसेना आणि धनुष्यबाण यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याबद्दल ते बोलत होते.
“संजय राऊतांचं मनस्वस्थ ठिक नाही” चित्रा वाघ यांची राऊतांवर टिका
न्याय देणे निवडणुक आयोगाच्या हातात आहे, त्याच्या प्रतिक्षेत आम्ही आहोत. पण हे करत असताना सर्व बाजू पडताळून पाहणं, दस्ताएवज पाहणं, कार खरं काय खोटं तपासलं गेलं पाहिजे. निवडणुक आयोग याची छाननी करेल, अशी आम्हाला खात्री वाटते. आजच्या सुनावणीदरम्यान वकील बाजू मांडतील. तसेच मागच्या वेळी त्यांच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले. तेही आम्ही खोडून काढू. सर्वांनीच मागच्या वेळी पाहिलं की, त्यांच्या मुद्यांमध्ये तथ्य नव्हते. ज्याला कायद्याचे ज्ञान आहे किंवा ज्याला समज आहे. त्याला देखील समजून येईल की, त्यांच्या मुद्यात दांभिकता होती. असंही ते म्हणाले.
“सत्यजित तांबे यांची बंडखोरी नाना पटोलेंमुळेच, खरगेंना पत्र, काॅंग्रेसमध्ये खदखद “
निवडणुक आयोगाकडे केलेल्या दाव्यानुसार शिंदे गटाकडे एकुण 40 आमदार, 13 खासदार, 144 पदाधिकारी, आणि 1,66,764 प्राथमिक सदस्य नोंदणी आहेत. तर संपुर्ण देशातील 11 राज्य प्रभारी असून ही सर्व कागदपत्रे निवडणुक आयोगाकडे सादर कऱण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडे विधानसभेचे 14 आमदार, विधान परिषदेचे 12 आमदार, लोकसभेचे 6 तर राज्यसभेचे 3 खासदार, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य एकूण 160, 2, 65, 542 पदाधिकारी संख्या, इतर राज्य प्रभारी 18 असून प्राथमिक सदस्य ही 18लाखांपेक्षा अधिक असून ही सर्व कागदपत्र निवडणुक आयोगाला देण्यात आली आहे.
“निवडणुक आयोग आणि तुमचं काही साठगाठ झालंय का?” सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला सवाल
मागील पाच ते सहा महिन्यापासून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणुक आयोगाकडे सुनावणी होत आहे. आज धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षासंदर्भात सायंकाळी सुनावणी होणार आहे. तर ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेविषयीची सुनावणी येत्या 14 फेब्रुवारीला होणार आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडील नेत्यांचं निवडणुक आयोगाच्या निकालाकडे लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- ठाकरे अन् शिंदे गटाकडून आयोगाकडे कागदपत्र सादर, ठाकरेंकडे 18 लाखांपेक्षा अधिक तर..
- देशातील आर्थिक असमानता रोखण्यास मोदी सरकार अपयशी, १ टक्के अब्जाधीशांच्या ताब्यात देशातील ४० टक्के संपत्ती
- “आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता, मात्र…;” अजित पवारांची काॅंग्रेसवर नाराजी
- शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, या तारखेला होणार विस्तार?
- “धनुष्यबाण चिन्हाबाबत ठाकरे गटाचा बी प्लॅन तयार” आज महत्वाची सुनावणी