मुंबई : राज्यात मागील काही वर्षापासून राणे कुटुबींय आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच संजय राऊतांनी आपली भाषा बदलावी अन्यथा फटके देऊ, असा इशारा निलेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांच्यावर जहरी टिका केली आहे.
“धनुष्यबाण चिन्हाबाबत ठाकरे गटाचा बी प्लॅन तयार” आज महत्वाची सुनावणी
निलेश राणे सारख्या घाणेरड्या वृत्तीचा माणुस या जगात कधी निर्माण झालेला नाही. तसेच निलेश राणे ही विकृती असून त्या विकृतीला आम्ही भीक घालत नाही. असा खोचक टोला विनायक राऊतांनी निलेश राणे यांच्यावर लगावला आहे. दोन दिवसापुर्वी निलेश राणे यांनी संजय राऊतांवर अतिशय गालच्या शब्दात टिका केली होती. त्यावर आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“संजय राऊतांचं मनस्वस्थ ठिक नाही” चित्रा वाघ यांची राऊतांवर टिका
एकनाथ शिंदे यांचा बोलवता धनी कोण आहे, त्याचा शोध घेतला तर ते आपल्याला कळेल. कोणत्यातरी राजकीय दबावापोटी आम्ही तुम्हाला करून देऊ, असं आश्वासन त्यांना शिवसेनेसंदर्भात देण्यात आलं आहे. त्यामुळे ते असे बोलत आहेत. असंही ते म्हणाले.
Read also
- “..तर उद्या शिंदे गटाचे वकीलही मीच मुख्य नेता असल्याचा दावा करतील”; ठाकरे गटाचा टोला
- ठाकरे अन् शिंदे गटाकडून आयोगाकडे कागदपत्र सादर, ठाकरेंकडे 18 लाखांपेक्षा अधिक तर..
- देशातील आर्थिक असमानता रोखण्यास मोदी सरकार अपयशी, १ टक्के अब्जाधीशांच्या ताब्यात देशातील ४० टक्के संपत्ती
- “आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता, मात्र…;” अजित पवारांची काॅंग्रेसवर नाराजी
- शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, या तारखेला होणार विस्तार?