पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनातन धर्माचा गजर केला म्हणून त्यांच्यावर शरद पवारांनी टीका करणे, हा त्यांचा सनातन धर्मद्वेष आणि 500-1000 व्होटबँकसाठी सुरू असलेली ‘खटाटोप’ उघड करते. त्यामुळे शरद पवार साहेबांना सनातन धर्मांच्या आचार-विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुस्तीला आपल्या व्होटबॅंकच्या राजकारणापासून दुरच ठेवा. असं भाजपने म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
धनुष्यबाणावरील सुनावणी आणखी लांबणीवर..पुढील सुनावणी 20 जानेवारीला
शरद पवार साहेब हे 1970 पासून कुस्तीच्या व पैलवानांच्या पाठीशी आधार बनून राहिले आहेत. मुंबई तालीम संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष, क्रीडा राज्यमंत्री असताना अनेक प्रसंगांत, अडचणींमध्ये पवारसाहेब कुस्ती क्षेत्राच्या पाठीशी राहिले आहेत. महाराष्ट्रातील अनेक कुस्तीगीरांना आजरपणाच्या काळात त्यांनी मदत केली आहे. पवार साहेबांची कुस्ती बद्दलचे प्रेम अवघा देश जाणतो. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन कुस्तीबद्दल उफाळून आलेले तुमचे प्रेम हे वोट बॅंकचे राजकारण करण्यासाठी आहे हे महाराष्ट्र बघतोय. असंही राष्ट्रवादीने भाजपला प्रत्युत्तर दिलंय.
“निलेश राणेंसारखा घाणेरड्या वृत्तीचा माणुस या जगात कधी निर्माण झालेला नाही”
पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सनातन धर्म की जय अशी घोषणा केली. त्यावरून शऱद पवारांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र केसरीच्या मैदानात फडणवीस यांच्याकडून पैलवानांच्या मानधन वाढीची घोषणा झाली. त्याचं स्वागतच आहे. पण तुम्ही म्हणता तसं कुणाची जय वैगरेची घोषणा झाली असेल तर ते अयोग्य आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी फडणवीसांना सुनावलं होतं. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टिका केली.
सनातन धर्म की जय!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनातन धर्माचा गजर केला म्हणून त्यांच्यावर शरद पवारांनी टीका करणे, हा त्यांचा सनातन धर्मद्वेष आणि 500-1000 व्होटबँकसाठी सुरू असलेली ‘खटाटोप’ उघड करते! #SanatanaDharma#sanatan#sanatani pic.twitter.com/qcEDYn7c1O— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 17, 2023
Read also
- “अतुल भातखळकरांसारख्या लोकांना विधानसभेऐवजी आश्रमात पाठवा”, राष्ट्रवादीने डिवचलं
- संकल्प करतो तोच इतिहास रचतो, सर्व कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून द्यावे;
- “शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविमा मिळाला नाही, त्यांना पीकविमा द्या”, राष्ट्रवादीची मागणी
- “हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा महान शोध लावणारे धन्य ते शिंदे-फडणवीस सरकार”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “पक्षात होता तेव्हा पक्षाच्या घटनेवर शिंदे गटाने शिवसेनेवर आक्षेप का घेतला नाही”; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद