बीड : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एका प्रकरणाबाबत परळी न्यायालयाने अटक वॉरटं जारी केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज परळी न्यायालयात हजेरी लावून आपली बाजू मांडली. तसेच त्यांना या प्रकरणी न्यायालयाने 500 रूपयांचा दंडही ठोठवला आहे. त्यआधी परळीत राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
संकल्प करतो तोच इतिहास रचतो, सर्व कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून द्यावे;
2008 साली एका आंदोनलानंतर राज ठाकरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्याचे पडसदा संपुर्ण राज्यभरात पसरले होते. तर ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक, करत सार्वजिनक मालमत्तेचं नुकसान केलं होतं. परळीतील धर्मापुरी पॉंईंटवर एसटीवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये त्यांचं मोठं नुकसान झालं होतं. याप्रकरणाबाबत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
“शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविमा मिळाला नाही, त्यांना पीकविमा द्या”, राष्ट्रवादीची मागणी
त्यावेळी त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्या जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्य याप्रकरणी राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरटं जारी करण्यात आले. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी परळी न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे.
“हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा महान शोध लावणारे धन्य ते शिंदे-फडणवीस सरकार”; राष्ट्रवादीने डिवचलं
दरम्यान वैदयकीय कारणांमुळेच राज ठाकरे न्यायालयात हजर राहू शकले नाही, हे आम्ही आज न्यायालयापुढे मांडले. न्यायालयाने हे मान्य केलं असून अटक त्यांच्याविरोधातील वॉरंट रद्द केला आहे. तसेच या प्रकऱणी 23 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
Read also
- “शिंदे-ठाकरे गट एकत्र आल्यास भाजप युती करणार का ?” जे.पी. नड्डांनी स्पष्टच सांगितलं
- नाशकात नवा ट्विट…! सत्यजित तांबेंनी काॅंग्रेस सोडली..? पक्षाची कारवाई होण्याअगोदर
- “फडणवीसांनी घोडा सजवला अन् त्यावर तुम्ही शिंदेंना बसवलं”; जे. पी. नड्डाचं उत्तर, म्हणाले की,…
- फडणवीसांची कुस्तीच्या आखाड्यात “सनातन धर्म की जय ची घोषणा”; पवारांची नाराजी, राष्ट्रवादी अन् भाजपची जुंपली
- “अतुल भातखळकरांसारख्या लोकांना विधानसभेऐवजी आश्रमात पाठवा”, राष्ट्रवादीने डिवचलं