नाशिक : आगामी काही दिवसात होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुराळा उडाला आहे. या सर्वांमध्ये नाशिक येथील पदवीधर मतदार संघ राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला. तो काॅंग्रेसच्या उमेदवारांमुळे. ऐनवेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी बंडाळी केल्याने त्यांच्यावर काॅंग्रेसने निलंबणाची कारवाई केली. यातच आता त्यांचे पुत्र आणि अपक्ष उमेदवार डॉ. सत्यजित तांबे यांनी देखील काॅंग्रेस सोडल्याचं संकेत दिलं आहे.
“हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा महान शोध लावणारे धन्य ते शिंदे-फडणवीस सरकार”; राष्ट्रवादीने डिवचलं
पक्षाविरूद्ध कारवाई केल्याप्रकरणी डॉ. सुधीर तांबे यांना काॅंग्रेसकडून निलंबणाची कारवाई करण्यात आली. यातच आता डॉ. सत्यजित तांबे यांना देखील काॅंग्रेस पक्षातून काढून टाकण्याची शक्यता असतांना सत्यजित तांबे यांनी काॅंग्रेस सोडल्याची चर्चा रंगली आहे. सत्यजित तांबे यांनी आपल्या समाज माध्यामांवरील प्रोफाईल अन् बायोमधून काॅंग्रेस आणि लोगो हटवलं आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी काॅंग्रेस सोडली का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.
यातच सत्यजित तांबे यांनी आपल्या सोशल मीडियावरील आपले प्रोफाईल बदलले आहे. त्यात त्यांनी वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावंच लागतं. असा मजकूर त्यांनी आपल्या संदेशात लिहिलं आहे. तसेच त्यांनी निवडणुकीत जनतेला विजय मिळवण्यासाठी साद घातली आहे. आता त्यांचे प्रयत्न किती यशस्वी होतात. ते पाहणं महत्वाचं आहे.
धनुष्यबाणावरील सुनावणी आणखी लांबणीवर..पुढील सुनावणी 20 जानेवारीला
दरम्यान, यातच आता नाशिक मधील पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील अशी लढत होणार आहे. यातच ऐऩवेळी सुधीर तांबेंनी बंडाळी केल्याने आघाडीने शुभांगी पाटील यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. तसेच सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात यावर सगळं काही स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Read also
- “फडणवीसांनी घोडा सजवला अन् त्यावर तुम्ही शिंदेंना बसवलं”; जे. पी. नड्डाचं उत्तर, म्हणाले की,…
- फडणवीसांची कुस्तीच्या आखाड्यात “सनातन धर्म की जय ची घोषणा”; पवारांची नाराजी, राष्ट्रवादी अन् भाजपची जुंपली
- “अतुल भातखळकरांसारख्या लोकांना विधानसभेऐवजी आश्रमात पाठवा”, राष्ट्रवादीने डिवचलं
- संकल्प करतो तोच इतिहास रचतो, सर्व कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून द्यावे;
- “शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविमा मिळाला नाही, त्यांना पीकविमा द्या”, राष्ट्रवादीची मागणी