पुणे : येत्या 30 जानेवारी रोजी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरीता मतदान होणार आहे. या निवडणुकांच्या प्रचारांचा धुराळा देखील उडाला आहे. या निवडणुकीत भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. परंतु बहुतेक ठिकाणी भाजपने आपले उमेदवार दिले नसून त्यांनी अपक्ष उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी भाजपला डिवचलं आहे.
नाशकात नवा ट्विट…! सत्यजित तांबेंनी काॅंग्रेस सोडली..? पक्षाची कारवाई होण्याअगोदर
काॅंग्रेसचे पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे , डॉ. रणजित पाटील, बाळाराम पाटील, नागो गणार, आणि विक्रम काळे यांचा विधानपरिषदेत आमदारपदाचा कालावधी अलिकडेच संपला. त्यासाठी नाशिक आणि अमरावती पदवीधर तर कोकण, नागपुर, आणि औरंगाबाद शिक्षक अशा एकून पाच मतदारसंघांसाठी निवडणुक होत आहे. यासाठी 30 जानेवारीला मतदान तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
“फडणवीसांनी घोडा सजवला अन् त्यावर तुम्ही शिंदेंना बसवलं”; जे. पी. नड्डाचं उत्तर, म्हणाले की,…
यावरून जगातील सर्वात जास्त सदस्य नोंदणी असलेल्या भाजपाला शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी पाच उमेदवार सापडले नाहीत. नाशिक, नागपूर मध्ये अपक्षाला पाठिंबा, तर औरंगाबाद मध्ये काॅंग्रेसचे 15 दिवसापुर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उमेदवाराला पाठिंबा. कोकण मध्ये शिवसैनिक आठवड्यापुर्वी भाजप मध्ये प्रवेश तर अमरावती मध्ये एकमेव भाजपचा उमेदवार रिंगणार उभा आहे. असं सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघ संपुर्ण निवडणुकीत चर्चेचा विषय ठरली आहे. कारण याठिकाणी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी बंडाळी केल्याने अन् त्याजागी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने मोठा गोंधळ बघायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
जगातील सर्वात जास्त सदस्य नोंदणी असलेल्या भाजपाला शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी पाच उमेदवार सापडले नाहीत.
नाशिक :अपक्षाला पाठिंबा
नागपूर : अपक्षाला पाठिंबा
औंरंगाबाद : काँग्रेसचे 15 दिवसापूर्वी भाजप प्रवेश.
कोकण : शिवसैनिक आठवड्यापूर्वी भाजप प्रवेश
अमरावती : एकमेव भाजप उमेदवार— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) January 18, 2023
Read also
- कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान.! राष्ट्रवादी अन् भाजप
- “सत्यजित तांबेंनी समर्थन मागितलं तर..”; बावनकुळेंनी स्पष्ट केलं, गोंधळात नाशिक
- ” मास्टरस्ट्रोक..! दावोस मधून प्रकल्प आणणार आणि गुजरातला पाठवून गिप्ट देणार”
- राज ठाकरेंच्याविरोधात अटक वाॅंरट जारी, जामीन मंजूर, 500 रूपयाचा दंड, प्रकरण काय ?
- “शिंदे-ठाकरे गट एकत्र आल्यास भाजप युती करणार का ?” जे.पी. नड्डांनी स्पष्टच सांगितलं