पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर दोन्ही मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणुक होणार आहे. पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील कसबापेठ मतदार संघात विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या दोन्ही जागेच्या पोटनिवडणुकरीता येत्या 27 फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“फडणवीसांनी घोडा सजवला अन् त्यावर तुम्ही शिंदेंना बसवलं”; जे. पी. नड्डाचं उत्तर, म्हणाले की,…
अलिकडेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबापेठ विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं गंभीर आजारानं निधन झालं. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सहा महिन्याच्या आत पोटनिवडणुक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजप पुन्हा आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का ? त्याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनांनंतर त्याजागी पोटनिवडणुक होणार त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी अश्विनी की बंधू शंकर जगताप या दोघांपैकी कोण निवडणुक लढेल, बिनविरोध होईल की राष्ट्रवादी निवडणुक लढवेल याची चर्चा असताना परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेऊ असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. तर कसबा पेठ विधानसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच सांगितले आहे.
“अतुल भातखळकरांसारख्या लोकांना विधानसभेऐवजी आश्रमात पाठवा”, राष्ट्रवादीने डिवचलं
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेने ऋुतजा लटके यांना उमेदवारी दिल्याने त्याठिकाणी भाजपने आपला उमेदवार माघारी घेतला. त्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणुक बिनविरोध झाली. त्यामुळे पुण्यातील य़ा दोन विधानसभेच्या मतदार संघातही पोटनिवडणुक बिनविरोध होईल की जोरदार लढत होईल. याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून आहे.
Read also
- “सत्यजित तांबेंनी समर्थन मागितलं तर..”; बावनकुळेंनी स्पष्ट केलं, गोंधळात नाशिक
- ” मास्टरस्ट्रोक..! दावोस मधून प्रकल्प आणणार आणि गुजरातला पाठवून गिप्ट देणार”
- राज ठाकरेंच्याविरोधात अटक वाॅंरट जारी, जामीन मंजूर, 500 रूपयाचा दंड, प्रकरण काय ?
- “शिंदे-ठाकरे गट एकत्र आल्यास भाजप युती करणार का ?” जे.पी. नड्डांनी स्पष्टच सांगितलं
- नाशकात नवा ट्विट…! सत्यजित तांबेंनी काॅंग्रेस सोडली..? पक्षाची कारवाई होण्याअगोदर